ठाण्यात राज्यातील पहिले मराठा वसतिगृह

एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण; महापालिकेला पहिलेपणाचा मान
mumbai
mumbaisakal

ठाणे : शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यात उभारण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतिगृहाचे लोकार्पण राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांची सोय असून यामध्ये स्वयंपाकघर व भोजन कक्षाची सुविधा अंतर्भूत आहे.

प्रत्येक खोलीमध्ये बैठक खोली, स्नानगृह, शौचालय असून त्यामध्ये पलंग, कपाट, अभ्यासासाठी टेबल व खुर्ची, गरम पाण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरली असल्याचे या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

mumbai
गणपती विशेष गाड्यांच्या गोंधळलेल्या नियोजनाचा प्रवाशांना त्रास

पोखरण रोड नंबर २ येथे ठाणे महापालिकेने उभारलेल्या या वसतिगृहाच्या चाव्या शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याला खासदार कुमार केतकर, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, मराठा क्रांती मोर्चा ठाणे, सकल मराठा समाज ठाणे तसेच मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. भाईंदरपाडा येथे वसतिगृहाचे काम सुरू असून त्या ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होणार असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले. स्व. धर्मवीर आनंद दिघे महिला भवनचा लोकार्पण सोहळाही शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

mumbai
मुंबईत आयसीयू बेड न मिळाल्याने क्षयग्रस्त महिलेचा मृत्यू

कार्यक्रमात बाचाबाची

ज्यांचे मराठा समाजासाठी योगदान नाही, त्यांची नावे सन्मानाने घेतली जात असल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश आंब्रे यांनी विरोध केला. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे व आंब्रे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मराठा समाजाने शांततेत अनेक मोर्चे काढले याची आठवण करून देत उगाच गोंधळ घालू नका, असे शिंदे यांनी सुनावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com