esakal | पेणमध्ये गावठी भाज्यांची आवक घटली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पेणमध्ये गावठी भाज्यांची आवक घटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पेण : ग्रामीण भागातील भाज्यांची (Vegetable) आवक कमी आणि मुंबई (Mumbai) , वाशी, पुणे (Pune) येथील मुख्य बाजारपेठेतून येणाऱ्या भाज्यांचे दर वाढल्याने पेणमध्ये भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. ऐन पितृपक्षात भाज्यांच्या किमती ३० ते ४० रुपयांनी वाढल्या असून मटार १८०, तर गवार १०० रुपये किलोने विकल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.

देशात पेट्रोल-डिझेल यांसह गॅसची दरवाढ दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेणच्या बाजारपेठेत १० ते १५ दिवसांपूर्वी भाज्यांचे भाव कमी झाले होते. मटार, गवार, फ्लॉवर, वांगी, भेंडी, घेवडा, कारली, टोमॅटो, शिराला, फरसवी, शेंग या भाज्या ६० ते ७० रुपयांनी विकल्या जात होत्या; मात्र पितृपक्षात याच भाज्यांच्या किमती ३० ते ४० रुपयांनी वाढल्य आहेत.

हेही वाचा: आयपीएलचा रन-संग्राम: Delhi Vs Mumbai ; पाहा व्हिडिओ

पेणच्या बाजारपेठेत मुंबई, वाशी, पुणे, नाशिक पितृपक्षात अनेक ठिकाणी भाज्यांची आवक वाढत असते; मात्र मुंबई किंवा पुण्यावरून येणाऱ्या भाज्यांची किंमत खूप वाढली आहे. परिणामी, पेणमधील बाजारपेठेत त्याचे दर वाढले आहेत. जर मुंबईच्या वाशी, पुणे मार्केटमधून येणाऱ्या भाज्यांचे भाव कमी झाले, तर ग्राहकांना भाजी स्वस्त देता येईल.

- मुबिन खान, भाजीविक्रेते, पेण

loading image
go to top