Mumbai Local News: मुंबईची 'लाईफलाईन' होत आहे लेट; तांबेंची नाराजी

lakhs of passengers who depend on local transport have to face heartache mumbai त्यामुळे लोकल वाहतुकीवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागतो, असं आ. सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं.
Mumbai Local News: मुंबईची 'लाईफलाईन' होत आहे लेट; तांबेंची नाराजी

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेची सेवा गेल्या अनेक महिन्यांपासून दर दिवशी दिरंगाईने सुरू असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत.

या गैरसोयीला आता आमदार सत्यजीत तांबे यांनी वाचा फोडली असून दर दिवशी किमान १५ ते २० मिनिटे उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीबाबत त्यांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. तसंच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत मुंबई महानगर प्रदेशासाठी एकात्मिक वाहतूक धोरण आखण्याचीही मागणी केली.

Mumbai Local News: मुंबईची 'लाईफलाईन' होत आहे लेट; तांबेंची नाराजी
Mumbai Local News: फुकट्यांची नाकेबंदी; एका दिवसात ७४७ प्रवाशांवर कारवाई

विविध नागरी आणि पायाभूत सुविधांबाबत सजगपणे आवाज उठवणारे आणि या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवणारे आमदार म्हणून आ. तांबे ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीबाबतचा आपला अनुभव समाजमाध्यमावर शेअर केला होता.

आता त्यांनी मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेच्या दिरंगाईबद्दल परखड भाष्य केलं आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या वेळापत्रकापेक्षा दोन ते तीन तास उशिराने धावत असतात. हे कमी की काय म्हणून मध्य रेल्वेवरच्या लोकल गाड्या दर दिवशी किमान १५ ते २० मिनिटं उशिराने धावतात. त्यामुळे लोकल वाहतुकीवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागतो, असं आ. सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचं आयुष्य लोकल गाड्यांच्या वेळापत्रकाला बांधलेलं असतं. अशा वेळी या गाड्याच उशिराने धावायला लागल्या, तर मुंबईकरांच्या आयुष्याची गाडी रूळांवरून घसरते.

अनेक जण आठवड्यातून किमान दोन वेळा तरी कार्यालयांमध्ये उशिरा पोहोचतात. काही वेळा तर गाडी खूप वेळ थांबल्यानंतर फक्त ऑफिसची वेळ गाठायला जीव धोक्यात घालून ट्रॅकवरून चालत जाणारे लोकही मी पाहिले आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे, अशी भावना आ. तांबे यांनी व्यक्त केली.

Mumbai Local News: मुंबईची 'लाईफलाईन' होत आहे लेट; तांबेंची नाराजी
Mumbai Local News: रेल्वे अपघातात तब्बल इतक्या जणांचा झाला ठाणे हद्दीत मृत्यू!

एकात्मिक वाहतूक धोरण हवं!

मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार यांनी एकत्रितपणे एकात्मिक वाहतूक धोरण आखण्याची गरज आहे.

रोजगारासाठी मुंबईकडे धाव घेणाऱ्यांसाठी त्यांच्या शहरालगतच कामधंदे कसे निर्माण करता येतील, याचीही चाचपणी व्हायला हवी. तसंच मल्टिमोडल कॉरिडॉर, सार्वजनिक वाहतुकीची अन्य साधने आणि त्यांची उपनगरीय रेल्वेसोबत सांगड या गोष्टी युद्धपातळीवर करण्याची गरज आहे.

– आ. सत्यजीत तांबे

Mumbai Local News: मुंबईची 'लाईफलाईन' होत आहे लेट; तांबेंची नाराजी
Mumbai Local News : उरणवरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यत रेल्वे लोकल सेवा सुरू करा - महेश बाळदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com