esakal | हुश्श, झाला एकदाचा 'एमपीएससी' चा पेपर!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

हुश्श, झाला एकदाचा 'एमपीएससी' चा पेपर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य लोकसेवा (State Public Service) आयोगाकडून आज राज्यभरात आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (MPSC) गट 'ब' पूर्व परीक्षा २०२० परीक्षा सुरळीत पार पडली असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (MPSC) गट 'ब' पूर्व परीक्षा २०२० ला राज्यभरातून तीन लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केली होती.

राज्यभरात परीक्षा एकूण एक हजार १६४ परीक्षा केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली. यंदा ११ एप्रिल रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन आयोगाकडून करण्यात आले होते; मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती.

सहाय्यक कक्ष अधिकारी (गट- ब), राज्य कर निरीक्षक (गट ब) आणि पोलिस उपनिरीक्षक (गट ब) पदांसाठी तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली. परंतु, हजारो उमेदवारांनी दांडी मारल्याचेही निदर्शनास आले आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०२० मध्ये घेण्यात येणारी पूर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ती शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत झालो.

हेही वाचा: पुणे विद्यापीठात ‘पीएच.डी’ प्रवेशाच्या ‘पेट परीक्षे’साठी अर्ज करता येणार

परीक्षेपूर्वी दीड तास अगोदर उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रावर येण्याबाबत पूर्वसूचना दिली होती. त्याप्रमाणे सकाळी नऊ वाजल्यापासून उमेदवारांनी परीक्षा उपकेंद्रावर गर्दी करण्यास सुरवात केली. त्यामुळे प्रवेशद्वाराबाहेर उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारातच उमेदवारांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. त्यानंतर सुरक्षित अंतर पाळत प्रवेश दिला जात होता.

loading image
go to top