ह्रदयरोगाने ग्रस्त एका महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

अतिशय गुंतागुंतीची ओपन हार्ट करेक्टिव्ह कार्डियाक सर्जरी होती.
 दोन महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात
दोन महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात File photo
Summary

अतिशय गुंतागुंतीची ओपन हार्ट करेक्टिव्ह कार्डियाक सर्जरी होती.

मुंबई:  हृदय विकारामुळे गंभीर आजारी असलेल्या दोन महिन्यांच्या बाळाने कोविड-19 वर यशस्वी मात केली आहे. नंदुरबारमध्ये स्थायिक असलेल्या अगरवाल कुटुंबाला कन्यारत्न झाला. पण, अवघ्या एका महिन्यात या बाळाला ह्रदय विकार असल्याचे समोर आले. त्यानंतर नातेवाईकांना या बाळाला मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला.

तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.  बाळाला जेव्हा रुग्णालयात भरती केले तेव्हाच ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे देखील समजले.  कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत कार्डियाक सर्जरीनंतरच्या परिणामांवर विपरीत प्रभाव पडण्याची शक्यता असते, त्यामुळे शस्त्रक्रिया दोन आठवड्यांनंतर करण्यात आली.

 दोन महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात
कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसला उशीर झाला तर? तात्याराव लहाने म्हणतात...

कोविडच्या दृष्टीने दोन आठवड्यांचा काळ सुरक्षित मानला जातो त्यामुळे दोन आठवड्यांनी कोविडमधून बरी झाल्यानंतर या मुलीला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. अतिशय गुंतागुंतीची ओपन हार्ट करेक्टिव्ह कार्डियाक सर्जरी यशस्वीपणे पार पडली आणि शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या तब्येतीमध्ये वेगाने सुधारणा घडून आली. उपचार, शस्त्रक्रिया यासाठी जवळपास संपूर्ण महिनाभर रुग्णालयात राहिल्यानंतर ही मुलगी घरी परतली.

 दोन महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात
मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनाने निधन

चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरचे संचालक डॉ. सुरेश राव यांनी सांगितले की, एक महिन्याच्या त्या मुलीचे वजन रुग्णालयात भरती करतेवेळी फक्त तीन किलो होते. ऑक्सिजन सॅच्युरेशन 86% इतके कमी होते. या मुलीला जन्मजात हृदयविकार असल्याचे आढळून आले होते, या आजाराला ऑब्स्ट्रॅक्टेड टोटल अनोमलस पल्मनरी वेनस कनेक्शन (टीएपीव्हीसी) असे म्हणतात.  सर्वसामान्यतः फुफ्फुसातून प्राणवायूने परिपूर्ण रक्त हृदयाच्या डाव्या झडपेमध्ये येते आणि तिथून ते संपूर्ण शरीराला पुरवले जाते.  पण, या बाळाच्या बाबतीत फुफ्फुसाकडून येणाऱ्या रक्तवाहिन्या हृदयाच्या डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला जोडल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नव्हता आणि फुफ्फुसांवर भरपूर ताण येत होता.  मुलीची स्थिती अतिशय गंभीर होती आणि तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते."

पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. तनुजा कारंडे यांनी सांगितले, " सध्याच्या वैद्यकीय माहितीनुसार कोविड-19 पॉझिटिव्ह असलेल्या मुलांमध्ये कार्डियाक शस्त्रक्रियेचे परिणाम चांगले होत नाहीत तसेच मृत्यू दर देखील जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, संपूर्ण खबरदारी घेत शस्त्रक्रिया केली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com