esakal | स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले चिमुकल्याचे प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

railway pointsman saved a child

स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले चिमुकल्याचे प्राण

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी या स्थानकावर अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. प्लॅटफॉर्मवर आपल्या आईसोबत जाणाऱ्या एका चिमुकल्याच कोल जाऊन तो धावत्या ट्रेनसमोर पडला. परंतु, सुदैवाने एका पॉइंट मॅनच्या सतर्कतेमुळे या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा व्हिडीओ वांगणी स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर या घटनेची चर्चा रंगली आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ १७ एप्रिलचा असून संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली आहे. एक अंध महिला आपल्या लहान मुलाला घेऊन वांगणी स्थानकातून जात होती. याचवेळी या चिमुकल्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवरुन थेट रेल्वे रुळावर कोसळला. याच दरम्यान, समोरुन एक धावती गाडी येत होती. यावेळी परिस्थितीचं भान राखत सेंट्रल रेल्वे मुंबई विभागाचे पॉइट मॅन मयुरेश शेळके यांनी तात्काळ चिमुकल्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याचे प्राण वाचवले.

दरम्यान, सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे सर्व स्तरांमधून मयुरेश शेळके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.