रंगकर्मींनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, केल्यात महत्त्वाच्या मागण्या

संतोष भिंगार्डे
Tuesday, 10 November 2020

सरकारने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्याबाबतची एसओपी (SOP) अजूनही आलेली नाही.

मुंबई : सरकारने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्याबाबतची एसओपी (SOP) अजूनही आलेली नाही. तसेच अन्य काही अडीअडचणी आहेत त्याबाबत दोन महिने पाठपुरावा करूनही  निर्णय झालेला नाही. या सगळ्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात याकरिता आज रंगकर्मींनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

सरकारने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी प्रत्यक्ष नाट्यगृहे सुरू करण्यास अडीअडचणी आहेत. नाट्यगृहाचे भाडे सरकारने सहा महिने घेऊ नये तसेच नाटकांचे साहित्य वाहून नेणारी वाहने बस-टेम्पो आहेत त्यांच्याकडून टोल घेऊ नये, अशा काही मागण्या नाट्य व्यावसायिकांच्या आहेत.

महत्त्वाची बातमी वरळी स्मशानभूमीत वेब कास्टिंगद्वारे पाहता येणार अंत्यसंस्कार, सरणाजवळ CCTV बसवणार

आज राज ठाकरे यांच्या भेटीत या सगळ्या मागण्यांसह अन्य काही समस्या रंगकर्मींनी राज ठाकरे यांना सांगितल्या. याबाबत आपण लक्ष घालू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.

यााबाबत निर्माते दिलीप जाधव म्हणाले, की सरकारला आम्ही यापूर्वीच निवेदने दिली आहेत. त्याबाबत काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत आपण लक्ष घालू असे आम्हाला आश्वासन दिले आहे. सरकारने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. पण एसओपी कुठल्याच नाट्यगृहाकडे दिली नसल्यामुळे दिवाळीचे अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

theater artist met MNS chief raj thackery for various demands


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theater artist met MNS chief raj thackery for various demands