esakal | नाट्यगृहांचा पडदा उघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नाट्यगृहांचा पडदा उघडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील नाट्यगृहे (Theaters) पाच नोव्हेंबरपासून (November) ५० टक्के आसन क्षमतेने सुरू होणार आहेत. याबाबत आज मुख्यमंत्री (CM) आणि भारतीय नाट्य परिषदेच्या (Indian Drama Council) सदस्यांची बैठक (Meeting) झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यावर हॉटेल, बार, एस्टॉरंट, मॉल आवश्यक निर्बंधांसह पुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; मात्र चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय अद्याप झाला नव्हता. त्यामुळे रंगकर्मीनी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. त्याची दखल घेत अखेर पाच नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीला नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ अध्यक्ष संतोष काणेकर उपस्थित होते

हेही वाचा: दीड लाखांत दोन चिमुरड्यांना विकले; पाहा व्हिडिओ

थोडा श्वास घेऊ द्या!

दीड वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमासह, नाट्यगृहे बंद असल्याने या क्षेत्राशी निगडित मंडळींवर बेरोजगारीची वेळ आली होती. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. निर्बंध घालून का होईना सांस्कृतिक क्षेत्राला थोडा मोकळा श्वास घेऊ द्या, अशी मागणी घेऊन कलाकार सरकारकडे कैफियत मांडत होते.

loading image
go to top