एक रिसेप्शन पार्टी, काही आगंतुक आणि तब्बल आठ लाखांची चोरी, असा घडला प्रकार..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

नवी मुंबई : लग्नसराईचा काळ आहे. अशातच लग्नात जेवायला अनेक फुकटे येणं ही नित्याची बाब. मात्र इथे जरा जास्त गंभीर घटना घडलीये. त्याचं झालं असं, उल्हासनगर येथे राहणारे व्यापारी कन्हैयालाल ग्वालानी (63) यांच्या मुलाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी रविवारी रात्री नवी मुंबईच्या एपीएमसीतील फॉर्च्यून हॉटेलमध्ये होती.

नवी मुंबई : लग्नसराईचा काळ आहे. अशातच लग्नात जेवायला अनेक फुकटे येणं ही नित्याची बाब. मात्र इथे जरा जास्त गंभीर घटना घडलीये. त्याचं झालं असं, उल्हासनगर येथे राहणारे व्यापारी कन्हैयालाल ग्वालानी (63) यांच्या मुलाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी रविवारी रात्री नवी मुंबईच्या एपीएमसीतील फॉर्च्यून हॉटेलमध्ये होती.

यावेळी ग्वालानी यांच्या नातेवाईकांनी आणि मित्र मंडळींनी नव वधूवरास अनेक प्रकारच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यातीलच एका नातेवाईकाने नव वधू वरास तब्बल 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे डायमंड नेकलेस आणि सोन्याचे नेकलेसची भेट म्हणून दिला होता. 

महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..

सदर दागिने असलेली पेपर बॅग स्टेजवर ठेवण्यात आली असताना, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या रिसेप्शन पार्टी मध्ये 'ते' घुसलेत आणि संधी साधून स्टेजवर ठेवण्यात आलेली डायमंड आणि सोन्याचे नेकलेस असलेली पेपर बॅग चोरून नेली.   

एपीएमसीतील तरांकित फॉर्च्युन हॉटेलमध्ये लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये घुसलेल्या अज्ञात चोरट्याने नव वधूवरांना भेटवस्तू म्हणून दिलेले तब्बल 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे डायमंड नेकलेस आणि सोन्याचे नेकलेस असलेली बॅग चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एपीएमसी पोलिसांनी या चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा : ही बातमी वाचून तुम्ही म्हणू शकता, अरे दूध कुठे पितो.. चल बिअर प्यायला जाऊ

रात्री उशिरा रिसेप्शन पार्टी संपल्यानंतर सर्व भेटवस्तू तपासण्यात आल्या असता, डायमंड आणि सोन्याचे नेकलेस असलेली पेपर बॅग त्यात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हॉटेल मधील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले असता, लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत घुसलेल्या अज्ञात चोरट्याने सदर दागिन्यांची पिशवी चोरून नेल्याची निदर्शनास आले.

त्यानंतर कन्हैयालाल यांनी सोमवारी सकाळी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तसेच चोरट्याचे सीसीटिव्ही फुटेज दिले.त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 

WebTitle : theft of around worth nine lac rupees diamond necklace from wedding reception  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of around worth nine lac rupees diamond necklace from wedding reception