Theft Case: झोपेत असलेल्या प्रवाशांची लूट, मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; १२ तासांत आरोपीला अटक
Railway Crime Branch: मेल व एक्स्प्रेस गाड्यांतील रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दागिन्यांच्या चोरीची घटना घडली. मात्र लोहमार्ग गुन्हे शाखेने केवळ १२ तासांत आरोपीला अटक केली.
डोंबिवली : मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून दागिने, रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कल्याण आणि मुंबई पथकाने १२ तासांत चिपळूण येथून अटक केली आहे.