esakal | कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ त्याला लक्षणं असतीलच असं नाही. त्या व्यक्तीला कोणतेही लक्षणं दिसत नसेल तरी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असू शकतो.

कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल २१ हजारांच्या पार पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात एकूण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तब्बल ६०००च्या वर आहे. मात्र यात तब्ब्ल ८३ टक्के रुग्णांना कोरोनाचे कोणतेही लक्षणं दिसले नाहीत तरीही ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाचे लक्षणं नसूनही कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर्स आणि वैज्ञानिक यावर चिंता व्यक्त करत आहेत. तसंच लक्षणं नसणारे रूग्ण नकळत कोरोनाचा संसर्ग वाढवत आहेत. अशा रूग्णांना Asymptomatic असं संबोधल्या जातंय.

#PPE किट घातल्याने सहा सहा तास पाणीही पिता येत नाहीत हो, घामाची अंघोळ होते; वाचा कोरोना वॉरियर्स कसे काम करतायत..

असिम्टमॅटिक (Asymptomatic) पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण म्हणजे नक्की काय?

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ त्याला लक्षणं असतीलच असं नाही. त्या व्यक्तीला कोणतेही लक्षणं दिसत नसेल तरी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असू शकतो. त्या व्यक्तीच्या उत्तम रोग प्रतिकारक शक्तीमुळे त्याला कुठल्याही प्रकारचे लक्षणं दिसत नाहीत.

प्री असिम्टमॅटिक ( Pre-Asymptomatic ) म्हणजे नक्की काय ?

Pre-Asymptomatic म्हणजे कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येणे. मात्र त्यावेळी कोणतेही लक्षणं न दिसणे. Pre-Asymptomatic म्हणजे टेस्टच्या काही दिवसांनंतर हळूहळू लक्षणं दिसायला सुरुवात होणं.

मोठी बातमी - ऐन लॉक डाऊनमध्ये आता पोलिसांच्या बदल्या... 

चीनच्या डायमंड क्रूझवरच्या कंटेनमेंट लॅबमध्ये टेस्ट करण्यात आल्या. त्यात ५० टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते मात्र ते Asymptomatic होते म्हणजेच त्यांना कुठलेही लक्षणं नव्हते. मात्र काही दिवसांनी त्यापैकी ७५ टक्के लोकांना लक्षणं दिसायला सुरुवात झाली. मात्र २५ टक्के रुग्ण Asymptomatic च होते.

या केसमध्ये २५ टक्के रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता अधिक प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या २५ टक्के लोकांना कुठलेही लक्षणं दिसले नाहीत. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, लक्षणं असणाऱ्या लोकांपेक्षा Asymptomatic लोकांमधून या व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. मात्र Asymptomatic लोकांमुळे संसर्ग होणार नाही असं नाही त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं आवश्यक आहे.

there are 83 percent Asymptomatic covid19 patients in maharashtra why this is happening