मुंबईत चाचण्या वाढवूनही फारसा उपयोग नाही; बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण फक्त 'इतकेच'!

समीर सुर्वे
Thursday, 17 September 2020

  • अँटीजेन चाचण्यांमधील 
  •  6 टक्के  रिपोर्ट पॉझिटिव्ह 
  • मुंबईत चाचण्यांवर अधिक भर 
     

मुंबई  :  कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने पालिकेकडून अँटीजेन चाचण्यांवर भर दिला आहे. महापालिका दररोज 7 हजारांहून अधिक अशा चाचण्या करत आहे. परंतु या चाचण्यांमधून बाधीत रूग्ण सापडण्याचे प्रमाण केवळ 6 टक्के आहे. त्यामुळे या चाचण्यांची संख्या वाढवून देखील त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही.

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

मुंबईत कमी वेळात जास्तीतजास्त कोरोना चाचण्या व्हाव्यात यासाठी पालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. महापालिका दररोज 15 हजारांहून अधिक चाचण्या करते. यात सुमारे 7 हजार अँटीजन चाचण्यांचा समावेश आहे. पालिकेने आता पर्यंत 9 लाखांच्या आसपास चाचण्या केल्या आहेत. त्यापैंकी सुमारे  1 लाख चाचण्या अँटीजेन आहेत. मात्र या चाचण्यांमधून पॉझिटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण मात्र फारच कमी आहे.
मुंबईत सध्या अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या सुरू आहेत. पालिकेकडून मंगळवारी 15,700 चाचण्या केल्या. त्यापैकी 7300  चाचण्या या अँटीजन होत्या. यानुसार केवळ 450 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह  दाखवले आहेत. त्याचे प्रमाण केवळ 6 टक्के इतके आहे.  तर घशातून स्त्राव घेऊन केल्या जाणा-या आपटीपीसीआर चाचण्यांमधील 2100 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण 25 टक्के आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमधील पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण हे अँटीजेन चाचाण्यांच्या 4 पट अधिक आहे.

दिग्दर्शक अनंत महादेवनचा "बिटरस्वीट" चित्रपट, 'बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये'!

ज्या रुग्णांना तीव्र स्वरूपाचे श्वसनविकाराची लक्षणे, ताप आहे, त्यांची त्वरित चाचणी करून रुग्णालयामध्ये दाखल करणे गरजेचे आहे अशा रूग्णांची अँटिजेन चाचणी केली जाते. या चाचणीचा निकाल केवळ तीस मिनिटांमध्ये आत येत असल्याने रूग्णावर चात्काळ उपचार सुरू करणे शक्य होते. प्रसूतीसाठी आलेल्या महिला,अपघातातील रूग्ण, शस्त्रक्रीयेसाठी आलेला रूग्ण यासाठी अँटीजेन चाचणी उपयुक्त ठरली आहे.  तसेच ही चाचणी तुलनेने स्वस्त आहे. तर आरटीपीसीआर चाचण्यांचा निष्कर्ष येण्यासाठी एक ते दोन दिवस लागतात.
मात्र या चाचण्यांच्या अचूक निदाना बाबत संशय व्यक्त केला जातोय.  त्यामुळे अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवली असली तरी त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांचे नमुने अँटीजन चाचण्यांमध्ये नेगेटिव्ह येत असल्याने अशा सर्व संशयित रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची करावी लागत लागते. 

 

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यभरात अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांच्या अचूक निदानाबद्दल संशय व्यक्त केला जातोय हे जरी खरे असले तरी ग्रामिण भागातील रूग्णांसाठी या चाचण्या फारच उपयुक्त ठरल्या आहेत. या चाचण्यांबाबत अजून तरी तक्रारी आलेल्या नाहीत.
- डॉ प्रदीप आवटे ,
राज्य सर्वेक्षण अधिकारी

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is not much use in increasing the tests in Mumbai