esakal | TB बाधित रुग्णांवर कोरोनाचा कोणताही परिणाम नाही? जाणून घ्या असं का होतंय..

बोलून बातमी शोधा

TB बाधित रुग्णांवर कोरोनाचा कोणताही परिणाम नाही? जाणून घ्या असं का होतंय..

मायकोबॅक्टीरियम म्हणजेच टीबी कोरोना विषाणूला थारा देत नाही त्यामुळे या रुग्णांना कोरोना विषाणूंची लागण होतांना दिसत नाही.

TB बाधित रुग्णांवर कोरोनाचा कोणताही परिणाम नाही? जाणून घ्या असं का होतंय..
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना संसर्गापासून दिर्घकालीन आजारी रुग्णांना अधिक धोका असल्याने त्यांना कोरोना संसर्गापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र टीबीच्या गंभीर रुग्णांवर कोरोना विषाणूंचा परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर टीबीने बाधित रुग्णांचा मृत्युदर ही कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 

टीबी या आजाराची लक्षणे तसेच आजारात घायची काळजी ही कोरोना आजाराशी साम्य सांगणारी आहे. सर्दी, ताप, खोकला तसेच फुफ्फुस निकामी होणे ही टीबी तसेच कोरोना संसर्गाची एकसरखी जाणवणारी लक्षणे आहेत. याशिवाय ज्या प्रमाणे तोंडातील उडालेल्या बिंदुकांच्या संपर्कातून टीबी होऊ शकतो अश्याच प्रकारे कोरोना संसर्गाची बाधा होत असल्याचे ही समोर आले आहे. टीबीने बाधित रुग्णाला देखील कोरोना रुग्णाप्रमाणेच क्वारंटाईन करावे लागते.

मोठी बातमी - अजित पवारांबाबत संजय राऊतांच 'मोठं' वक्तव्य, पत्रकार परिषदेत राऊत म्हणालेत...

याबाबत बोलतांना पालिकेच्या टीबी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ ललीतकुमार आनंदे यांनी अ‍ॅक्टिव्ह पीटीबी टीबी झालेल्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे सांगितले. ऍक्टिव्ह पिटीबी रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे फारच क्वचित आढळत असल्याचे ही तेे म्हणाले. ऍक्टिव्ह पीटीबी रूग्णांना कोरोना ऍक्टीव्ह रुग्णांच्या संपर्काचा परिणाम होऊ शकत नाही असे निरीक्षण ही त्यांनी नोंदवले.

कोरोना संसर्गामुळे शिवडीतील टीबी रूग्णालयात दाखल झालेल्या पीटीबी रूग्णांच्या मृत्यू दरात वाढ होईल अशी अंदाज व्यक्त होत होता. एकूण दाखल रुग्णांपैकी दररोज सुमारे 100 ते 200 पर्यंत रुग्णांचा मृत्यू होईल अशी भीती ही व्यक्त होत होती. टीबी ने ग्रस्त रुग्ण हे  इम्युनोकोम्प्रमाइज्ड असतात, तसेच त्यांच्या फुफ्फुसाचे अर्धे किंवा पूर्ण नुकसान झालेले असते.त्यामुळे या रुग्णांना कोरोना विषाणूंचा फटका बसेल असे वाटत होते. मात्र असे काहीही झाले नसल्याचे ही डॉ आनंदे सांगतात. 

मोठी बातमी - मुंबई, पुण्यातील फेरीवाल्यांबद्दल स्पष्ट केली भूमिका, सरकार म्हणतंय....

आपल्याकडे कोरोना संसर्ग साधारणतः जानेवारी महिन्यात दाखल झाला. मात्र नेमका तेव्हापासूनच टीबी रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे डॉ. आनंदे यांचे म्हणणे आहे. टीबी ने ग्रस्त रुग्णांना जी औषध दिली जातात त्या औषधांचा हा परिणाम असण्याची शक्यता डॉ आनंदे यांना वाटते. टीबीमुळे रुग्णाच्या श्वसनमार्गामधील सिलिया खराब होतो. त्यामुळे अश्या रुग्णाच्या आत शिरलेल्या विषाणूला तेथे थांबू देत नाही हे देखील एक कारण असण्याची शक्यता डॉ आनंदे वर्तवतात.मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचे ही ते म्हणतात.

मायकोबॅक्टीरियम म्हणजेच टीबी कोरोना विषाणूला थारा देत नाही त्यामुळे या रुग्णांना कोरोना विषाणूंची लागण होतांना दिसत नाही. टीबी रुग्णालयात आज 450 हुन अधिक रुग्ण आहेत. कोरोना चाचणीत केवळ एक एक्सडीआर टीबी प्रकरणातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापाडला. आजपर्यंत मायकोबॅक्टीरियम इतका आक्रमक का होता आणि कोरोना विषाणू परत आल्यानंतर तो शांत का झाला हे समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगत यावर अधिक संशोधन केल्यास अनेक महत्वाचे खुलासे होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

there is very less effect of covid19 or no effect of corona on TB patients