सोशलमीडियावर अफवा पसरवत असाल तर खबरदार! वाचा बातमी सविस्तर

सोशलमीडियावर अफवा पसरवत असाल तर खबरदार! वाचा बातमी सविस्तर

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना काही व्यक्ती समाज माध्यमांवरून अफवा पसरवत आहेत. अशाच अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानकाबाहेर स्थलांतरित कामगारांची गर्दी झाली होती. त्यानंतर समाज माध्यमांवरील 30 पेक्षा जास्त अकाऊंट महाराष्ट्र सायबर विभागाच्या रडारवर आली आहेत. 

समाज माध्यमांवरून अफवा पसरवण्याचे प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहेत. व्हॉट्‌सऍपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास ऍडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सायबर पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हॉट्‌सग्रुपच्या ऍडमिननी फक्त आपण संदेश पाठवू शकता, असे सेटिंग करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वांद्रे येथील प्रकरणानंतर अशा 30 अकाऊंटची माहिती घेण्यात येत आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस टिकटॉक ,फेसबुक, ट्‌विटर व अन्य समाज माध्यमांवरील गैरप्रकारांवर लक्ष ठेवून आहे. 

201 गुन्हे, 37 अटकेत 
राज्यभरात समाज माध्यमांवरून अफवा परसवणाऱ्यांविरोधात 201 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. बीडमध्ये 26, कोल्हापूरमध्ये 15, पुणे ग्रामीणमध्ये 11, मुंबईत 10, जालन्यात 13, साताऱ्यात 7, नांदेडमध्ये 7, परभणीत 7, नाशिक ग्रामीणमध्ये 6, नागपूर शहरात 5, नाशिक शहरात 6, ठाणे शहरात 5, सिंधुदुर्गमध्ये 5, बुलडाण्यात 4, पुणे शहरात 4, गोंदियात 4, सोलापूर ग्रामीणमध्ये 5, नवी मुंबईत 2, उस्मानाबादमध्ये 2, ठाणे ग्रामीणमध्ये 1, लातूरमध्ये 4 आणि धुळ्यात 1 अशी गुन्ह्यांची संख्या आहे. आतापर्यंत 37 जणांना अटक करण्यात आली आहे. ओळख पटलेल्या 114 व्यक्तींना लवकरच अटक करण्यात येणार आहे. 

आतापर्यंत 
व्हॉट्‌सऍप संदेश फॉरवर्ड : 99 गुन्हे 
फेसबुक पोस्ट शेअर : 66 गुन्हे 
टिकटॉक व्हिडीओ शेअर : 3 गुन्हे 
ट्‌विटरवरून भाष्य : 3 गुन्हे 
यूट्युब चित्रफीत अपलोड : 37 गुन्हे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com