esakal | 'महिला राज' असलेल्या स्थानकात होणार वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

'महिला राज' असलेल्या स्थानकात होणार वाढ

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी नुकताच सीएसएमटी (CSMT) ते दादर (Dadar) लोकल प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. तर, माटुंगा (Matunga) रेल्वे स्थानकाला (Railway Station) भेट देऊन तेथील महिला रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सर्व महिला (Women) रेल्वे कर्मचाऱ्यांसह देशातील पहिले रेल्वे स्थानक असलेल्या माटुंगा (Matunga) रेल्वे स्थानकातील महिला रेल्वे कर्मचाऱ्यांचा दानवे यांनी सत्कार केला. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी आणखीन काही संपूर्ण रेल्वे स्थानकाची जबाबदारी, मोठ्या रेल्वे स्थानकाची धूरा महिलांच्या खांद्यावर द्यावी, असे वक्तव्य दानवे यांनी केले. त्यामुळे 'महिला राज' असलेल्या स्थानकात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मध्य रेल्वेवरील संपूर्ण महिला कर्मचारी संचलित असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानकाचा 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानक देशातील पहिले 'महिला राज' स्थानक आहे. माटुंगा रेल्वे स्थानकात स्थानक प्रबंधक, तिकिट तपासनीस, सफाई कर्मचारी या पदावर महिला कर्मचारी आहेत. तर, माटुंगा स्थानक इतर रेल्वे स्थानकापेक्षा हटके दिसण्यासाठी गुलाबी रंगाने रंगविण्यात आला आहे. यासह काही विद्युत दिवे देखील गुलाबी रंगाचे आहेत. त्यामुळे माटुंगा स्थानकाची वेगळी ओळख तयार झाली आहे. दानवे यांनी स्थानकाला भेट देऊन महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

दानवे यांनी महिला कर्मचाऱ्यांसमोर असलेल्या आव्हानांची माहिती विचारली. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी आव्हानांवर धैर्याने आणि दृढनिश्चयाने कशी मात केली याची माहिती दिली. दरम्यान, महिला सशक्तीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे माटुंगाप्रमाणे इतर आणखीन रेल्वे स्थानकांची जबाबदारी महिलांकडे द्यावी, अशी चर्चा दानवे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी केली.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी खुशखबर! माटुंगा-मुलुंड मेगाब्लॉक रद्द

सध्या माटुंगा रेल्वे स्थानकात 37 महिला कर्मचारी कार्यरत असून 4 सुरक्षा रक्षक, 2 सफाई कर्मचारी, 8 ऑपरेटिंग स्टाफ, 15 कमर्शियल स्टाफ आणि तिकिट तपासनीस 8 आहेत. त्यामुळे देशातील पहिले महिला राज असलेल्या या स्थानकाची दखल लिम्का बुकने घेतली असून या स्थानकाचा समावेश लिम्का बुक रेकॉर्डमध्ये केला आहे.

loading image
go to top