हे 240 मजूर पलायनच्या होते तयारीत, पण घडलं असं की...

हे 240 मजूर पलायनच्या होते तयारीत, पण घडलं असं की...

ठाणे ः लॉकडाऊन असतानाही गावी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 240 मजूरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची निवासाची तसेच भोजना करण्याची विनंती महापालिका प्रशासनांना केली.

मूळचे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असलेले 231 मजूर कल्याणहून निघाले होते. त्यांना कल्याणात रोखण्यात आले. तातडीने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे तपमान पाहण्यात आले. लॉकडाऊनचा आम्हाला चांगलाच फटका बसला आहे. नोकरी नाही, त्यामुळे पैसे नाहीत, त्यामुळे खायला काहीही नाही, गावाकडे जाण्याशिवाय काहीही पर्याय नाही असे या मजूरांनी सांगितले. 

ठाण्यात ट्रकमधून बेकायदा प्रवास करणाऱ्या तेरा जणांना पोलिसानी ताब्यात घेतले. ते मुंबईतून निघाले होते. ट्रकवर जीवनावश्यक सेवेसाठी असे लिहिले होते. त्यानंतरही पोलिसांनी शंका आली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तपासणी केली. एका ट्रकमधून आठ जण मध्य प्रदेशला निघाले होते, तर अन्य एका ट्रकमधील पाच जण नाशिकला निघाले होते, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

These 240 laborers were preparing to flee, but it so happened that ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com