esakal | 'या' नागरिकांना मिळाली ऑनलाईन मोबाईल, टीव्ही, फ्रिज विकत घेण्याची मुभा...
sakal

बोलून बातमी शोधा

'या' नागरिकांना मिळाली ऑनलाईन मोबाईल, टीव्ही, फ्रिज विकत घेण्याची मुभा...

'ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये ई-कॉमर्सला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असं अमेझॉनच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. 

'या' नागरिकांना मिळाली ऑनलाईन मोबाईल, टीव्ही, फ्रिज विकत घेण्याची मुभा...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - उद्या दुसरा लॉक डाऊन संपतोय. अशात केंद्राने तिसरा लॉक डाऊन देखील जारी केलाय. तिसऱ्या लॉक डाऊनमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही नियम शिथिल करून काही उद्योगांना सशर्त परवानगी  देण्यात आली आहे. यामध्य ई कॉमर्स कंपन्यांना देखील काहीशी मुभा देण्यात आलीये. त्यामुळे तुम्ही जर या ग्रीन झोनमध्ये किंवा ऑरेंज झोनमध्ये असाल तर तुम्हाला आता टीव्ही, फ्रिज, मोबाईल, लॅपटॉप अशा वास्तूंची खरेदी करू शकणार आहेत. लॉक डाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आता उपाययोजना राबण्यास सुरवात करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून लघु व मध्यम उद्योग आणि व्यापाऱ्यांना ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त शिथिलता देण्यात आली आहे.    

इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय; एप्रिल महिन्यात 'इतक्या' विकल्या गेल्यात गाड्या

केंद्राकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आलीये. यामध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांकडून अत्यावश्यक आणि अनावश्यक वस्तूंच्या विक्रीला सुरवात करण्यात येणार आहे. मात्र मुंबई आणि मुंबई MMR त्याचसोबत पुणे आणि पुणे MMR भाग त्याचबरोबर नागपूर ही मोठी शहरं रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिकांना याचा फायदा मिळणार नाहीये. केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये या वस्तू विकता वा विकत घेता येणार आहेत. 

मातोश्रीच्या दारावर पुन्हा कोरोनाची ठकठक, आणखी तीन पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढतोय, येत्या काळात  पारा आणखी वाढताना पाहायला मिळणार आहे. अशात अनेक नागरिक अतिरिक्त पंखे, AC कुलर किंवा फ्रिज यासारख्या गोष्टी विकत घेत असातात. अशात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आता ई कॉमर्स मार्फत या वस्तूंची विक्री सुरु केल्याने व्यापारी उद्योजक आणि ग्राहक तिघांचा फायदा होणार आहे.       

'ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये ई-कॉमर्सला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असं अमेझॉनच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. 

these people have permission to buy tv fridge mobile online