esakal | पुनःश्च लॉकडाऊन : १९ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये 'या' गोष्टी राहणार सुरु, 'या' राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

पुनःश्च लॉकडाऊन : १९ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये 'या' गोष्टी राहणार सुरु, 'या' राहणार बंद

मुंबई लगतच्या MMR भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येतोय. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून आता पुन्हा एकदा कठोर पावलं उचलायला सुरवात झालीये.

पुनःश्च लॉकडाऊन : १९ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये 'या' गोष्टी राहणार सुरु, 'या' राहणार बंद

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मुंबई लगतच्या MMR भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येतोय. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून आता पुन्हा एकदा कठोर पावलं उचलायला सुरवात झालीये. मिशन बिगिन अंतर्गत खरंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती, मात्र त्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याचं निदर्शनास आलं. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. सर्वात आधी ठाणे आणि त्या मागोमाग कल्याण डोंबिवलीमध्ये  १९ जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळला जाणार आहे. काल संध्याकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेने जारी केलेल्या आकडेवारीत गेल्या २४ तासात ६०० पेक्षा अधिक रुग्णांची  वाढ झालेली समोर आलीये. 

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने १२ तारखेपर्यंतचा लॉकडाऊन १९ पर्यंत वाढवलाय. यामध्ये काय सुरु राहील आणि काय बंद राहील हे जाणून घेऊयात. 

मोठी बातमी : कोरोनाच्या बाबतीत मुंबई 'अंडर कंट्रोल', पण सावधान कारण..

या गोष्टी राहतील सुरु : 

सर्व रुग्णालयं, मेडिकल स्टोअर्स, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांसाठी पेट्रोल पंप खुले राहतील. भाज्या आणि किराणा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात ली आहे. अन्नधान्य, भाज्यांची होम डिलेव्हरी सुरु राहील. सरकारी नियमांप्रमाणे बँक आणि बँकांचे ATM सुरु राहतील. मध्यविक्रीच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आलीये.  प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी याना देखील परवानगी देण्यात अली आहे. 

मोठी बातमी :  ठाणे आरटीओ अधिकाऱ्यांकडून खासगी बस वाहतूकदारांची पिळवणूक; कोणी केलाय हा धक्कादायक आरोप वाचा

या सर्व गोष्टी राहणार बंद : 

ऑड इव्हन सूत्रानुसार मिशन बिगिन अंतर्गत दुकानं सुरु करण्यात आली होती. मात्र आता अगदी सुरवातीच्या लॉकडाऊन प्रमाणे जीवनावश्यक सेवा देणारी दुकानं वगळून इतर सर्व दुकाने बंद राहतील. केवळ जीवनावश्यक सेवेसाठी खासगी प्रवासी वाहतूक करता करत येईल. अत्यावश्यक सेवेतल्या रिक्षा, बस, टॅक्सी वगळता बाकी इतर सार्वजनिक वाहतूक बंद राहतील. कलम १४४ अंतर्गत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी जमण्यास बंदी आहे. अत्यावश्यक सेवा आणि त्यांचे सप्लायर्स वगळता कारखाने आणि ऑफिसेस बंद राहतील. सरकारी ऑफिसेसमध्ये देखील किमान उपस्थितीत कामं पार पडतील. 

these things will have permission to operate in extended lockdown and these things will not operate