मोठी दिलासादायक बातमी! मुंबईतील 'या' दोन विभागांनी गाठले शतक; वाचा सविस्तर बातमी..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

कोरोना  रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांमुळे सांताक्रुझ पूर्व आणि माटुंगा पूर्व या दोन विभागांनी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत

मुंबई : कोरोना  रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांमुळे सांताक्रुझ पूर्व आणि माटुंगा पूर्व या दोन विभागांनी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत १०८ दिवसांचा टप्पा गाठत शतकपूर्ती केली आहे. रुग्ण दुपटीचा हा कालावधी देशातील सर्वाधिक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

हेही वाचा: आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम; पावसासाठी आता पुढील महिन्याचीच प्रतिक्षा... 

वांद्रे पूर्व, माटुंगा व वडाळ्यामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०० वर पोहचला आहे.  तर संपूर्ण मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे सरासरी प्रमाण हे ४१ दिवस इतके आहे. कोविड प्रतिबंधासाठी महापलिका सातत्याने विविध उपाययोजना राबवत आहे. चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत रुग्णांचा घेण्यात येणारा शोध आणि रुग्णांमागे १५ जणांना प्रभावी क्वारंटाईन, प्रभावी औषधोपचार, निर्जुंतुकीकरण मोहिम राबवल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.  

सुरुवातीला कोरोना हॉटस्पॅाट ठरलेले विभाग आता नियंत्रणात आले आहेत. यांमध्ये वांद्रे पूर्व  खार पूर्व इत्यादी भागांचा समावेश असणाऱ्या 'सांताक्रुझ पूर्व'  आणि माटुंगा, वडाळा या परिसरांचा समावेश असणाऱ्या माटुंगा पूर्व विभागाने रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०८ चा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा: बोगस वेबसाईट्सवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही; मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट.. 

मुंबई महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आवाहनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळेच कोविड संसर्गास अधिकाधिक प्रतिबंध करण्यास बळ मिळाले आहे असा दावा पालिकेने केला आहे.

these two wards in mumbai makes century in this reason read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these two wards in mumbai makes century in this reason read full story