आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम; पावसासाठी आता पुढील महिन्याचीच प्रतिक्षा... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

मुंबईत पावसाचे आगमन वेळेत झाले, पण नंतर त्यात मोठा खंड पडला. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढत आहे. ही आर्द्रता 90 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे दिवसा तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस जरी असल्याने उकाडा असह्य होत आहे.

मुंबई : यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला असला तरी पावसाचा जोर म्हणावा तसा वाढलेला नाही. गेल्या आठवड्यात राज्यासह मुंबईत पावसाची जोरदार एन्ट्री झाली. मात्र, या आठवड्यात पावसाने दडी मारली. मुंबईकरांना दमदार पावसासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

तीन महिन्यानंतर प्रथमच मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक...

पावसाने खंड दिल्याने आणि दमट हवामानामुळे मुंबईत कमालीची आर्द्रता वाढली आहे. आणि याच वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम होत आहे.  कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन झाले असले तरी मुंबईत पाहिजे तितका  पाऊस झालेला नाही. मुंबईच्या विविध भागांत रात्री आणि पहाटे पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडून जातात. 

या वर्षातील सर्वात मोठं प्रॉपर्टी डिल, दोन अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल 136 कोटी रुपये 

मुंबईत पावसाचे आगमन वेळेत झाले, पण नंतर त्यात मोठा खंड पडला. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढत आहे. ही आर्द्रता 90 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे दिवसा तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस जरी असल्याने उकाडा असह्य होत आहे. वाढते तापमान आणि आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम होत आहे, अशी माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.  

हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...

येत्या 24 तासांत मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या तुरळक ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: humidity increased in mumbai, there is no chance of raining upto next month