esakal | बापरे ! मुंबईत 'या' भागांमध्ये कोरोनाची पुन्हा लाट; आरोग्य खात्याची चिंता वाढली..
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मलबार हिल, पेडर रोडसह ग्रॅन्टरोडमध्ये कोरोनाची पुन्हा लाट पसरली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याला टेन्शन आले आहे.

बापरे ! मुंबईत 'या' भागांमध्ये कोरोनाची पुन्हा लाट; आरोग्य खात्याची चिंता वाढली..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई:  मलबार हिल, पेडर रोडसह ग्रॅन्टरोडमध्ये कोरोनाची पुन्हा लाट पसरली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याला टेन्शन आले आहे. पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये जवळपास आटोक्यात आलेला कोरोना संसर्ग गेल्या चार -पाच  दिवसांपासून पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 

यामध्ये दररोज ३० ते ३५ च्या सरासरीने होणारी रुग्णवाढ आता गेल्या पाच दिवसांपासून सरासरी ५० वर पोहचली आहे.  ही वाढ मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीचकँडी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विभागातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी  पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. ग्रॅन्टरोड परिसरात आतापर्यंत २२०५ कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले.

हेही वाचा: सुशांतच्या आत्महत्येस कारण की... काय म्हणताहेत संजय राऊत, वाचा 

यातील १५०० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडले आहे.  त्यामुळे फक्त ६०२ कोरोना रुग्ण असल्याचे पालिका प्रशासनाकडून  सांगण्यात आले. येथे सुरुवातीपासून कोरोना नियंत्रणात होता. मात्र या परिसरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रुग्ण वाढले असल्याचे समोर आले आहे. 

५ जूनपासून २० दिवसांत ५०० हून जास्त रुग्ण  वाढले आहेत. यामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये काम करणार्‍या ड्रायव्हर, हाऊसकिपिंग कामगार, सिक्युरिटी गार्ड यांची संख्या १७० आहे. धारावी, मानखुर्दसह परराज्यातून आलेले काही कामगार यात समाविष्ट असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. प्रवास करून येताना या कामगारांना लागण होत आहे. 

हेही वाचा: नालासोपरा हादरलं! तीन मुलांची हत्या करुन पित्यानं उचललं हे पाऊल...

मात्र पॉझिटिव्ह असूनही लक्षणे दिसत नसल्याने संपर्क वाढला व त्यामुळे संसर्गाचा फैलावत  असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, ग्रँटरोडमध्ये कोरोना रोखण्यासाठी ११ कंटेनमेंट झोन आहेत. तर १८४ इमारती आणि इमारतींचे भाग सील करण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाते  आहे.
these zones in mumbai has more corona patients again