कासा बाजारपेठेत भुरट्या चोराचा सुळसुळाट; किमती कपडे व रोख रक्कम घेवून पाबोरा | Kasa crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 crime news

कासा बाजारपेठेत भुरट्या चोराचा सुळसुळाट; किमती कपडे व रोख रक्कम घेवून पाबोरा

कासा : डहाणू (Dahanu) तालुक्यातील कासा बाजारपेठेत (kasa Market) सोमवारी रात्रीच्या सुमारास दिल्ली फॅशन या रेडिमेड कपड्याच्या (robbery crime) दुकानात चोरी झाली. चोर दुकानाच्या मागून चढून वरील पत्रे उचकटून दुकानात शिरले. आतील किमती कपडे (Branded clothes) व गल्ल्यातील रोख रक्कम (cash) घेऊन पाबोरा केला.

हेही वाचा: अजित पवारांच्या शब्दाला काही किंमत नाही, आधिवेशनाआधी फडणवीसांची टीका

कासा बाजारपेठेत जगमोहन सिंग गोवर यांचे दिल्ली फॅशन नावाचे रेडिमेड कपड्याचे दुकान आहे. सोमवारी (ता. २१) रात्री आठनंतर ते दुकान बंद करून घरी निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी अशीच एका किराणा दुकानातदेखील चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे कासावासीयांच्या मनात या भुरट्या चोरांची भीती निर्माण झाली आहे. व्यापारी संघटनानी व पोलिसांच्या सहकार्याने कासा बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत; पण चोरटे दुकानाच्या पुढून चोरी न करता मागच्या बाजूने येत असल्याने कोणताही पुरावा सापडत नाही. त्यामुळे गुरखा व रात्रीचा पहारा वाढवावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Thief Robbed Clothes And Cash In Delhi Fashion Clothes Shops At Kasa Market Kasa Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :robberycrime update
go to top