Video : बीअर घेण्यासाठी आला, 70 हजाराचा मोबाईल घेऊन पळाला; एका तासात चोरटा अटकेत

thief who stole a mobile worth Rs 70000 from a beer shop has been arrested watch video
thief who stole a mobile worth Rs 70000 from a beer shop has been arrested watch video

डोंबिवली - ठाकुर्ली चोळेगाव परिसरात असलेल्या एका बिअर शॉप मध्ये बिअर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकान मालकाचा 70 हजाराचा मोबाईल चोरुन पळ काढल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप यांच्या पथकाने एका तासात सीसीटीव्हीच्या आधारे ठाकुर्ली परिसरात चोरट्याचा पाठलाग करत त्याला अटक केली आहे. विवेक कुमार श्याम बिहारी श्रीवास्तव (वय 22) असे अटक आरोपीचे नाव असून तो फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

thief who stole a mobile worth Rs 70000 from a beer shop has been arrested watch video
KKR News : रिंकूने ५ छक्के ठोकले… पण KKRच्या डगआऊटमधला 'तो' दु:खी दाढीवाला कोण?

ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारे पदमाकर चौधरी (वय 48) यांचे लव कुश बिअर शॉप आहे. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास त्यांच्या दुकानात विवेक कुमार हा बिअर घेण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने पद्माकर यांची नजर चुकवित काऊंटरवर असलेला त्यांचा 70 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन तेथून पळ काढला.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

thief who stole a mobile worth Rs 70000 from a beer shop has been arrested watch video
Dalai Lama: 'त्या' वादग्रस्त व्हिडिओवर दलाई लामांचं स्पष्टीकरण, व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले...

बिअर न घेता ग्राहक परत गेल्याने तसेच काऊंटरवर मोबाईल नसल्याची बाब लक्षात येताच पद्माकर यांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत. मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, विशाल वाघ, नितीन सांगळे यांच्या पथकाने पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोबाईलचा आणि आरोपीच्या घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासत चोरट्याचा शोध सुरु केला.

एका तासाच पोलिसांनी चोरट्याचा ठाकुर्ली परिसरात शोध घेत त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरी केलेला 70 हजार रुपये किंमतीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com