

3rd Mumbai Project
ESakal
बापू सुळे
मुंबई : रायगड जिल्ह्यात कर्नाळा-साई-चिरनेर पट्ट्यात (केएससी टाऊन) तिसरी मुंबई उभारली जाणार असल्याचे दशकभरापासून कानावर पडत असले तरी जमीन अधिग्रहणाचे मोठे आव्हान आहे. एमएमआरडीएकडून राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी ३२३ चौरस किलोमीटरची जमीन अधिग्रहण करावी लागणार असल्याने येथील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जमीन अधिग्रहणासाठी सिडको आणि एमआयडीसीचे धोरण एमएमआरडीएकडून अवलंबले जाणार आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना जमिनीच्या मोबदल्याबरोबरच विकसित भूखंड मिळू शकणार आहेत.