विक्रमगड : आश्रम शाळेतील 13 विद्यार्थ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना |vikramgad corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
विक्रमगड : आश्रम शाळेतील 13 विद्यार्थ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

विक्रमगड : आश्रम शाळेतील 13 विद्यार्थ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात करोनाचा उद्रेक (corona patients) झाल्याचे पाहायला मिळत आहे. दादडे येथील एका आश्रम शाळेत 13 विध्यार्थी व 3 कर्मचारी ((students and employee) यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह (corona positive) आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप निंबालकर यांनी दिली. (Thirteen students and three employees of dadade ashram school corona positive)

हेही वाचा: मुंबईत पुन्हा रूग्ण वाढ; 24 तासांत 16 हजारांहून अधिकांची नोंद

या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या 13 विध्यार्थी 9 वी,10 वी,11वी 12 वी वर्गातील विध्यार्थी असून 14 ते 18 वयोगटातील हे सर्व विध्यार्थी आहेत. या सर्वांना घरीच विगलीकरणात ठेवण्यात आलं आहे. वैद्यकीय डॉक्टरांची टीम देखरेखीसाठी तैनात करण्यात आली आहे. या सर्वांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागा कडून देण्यात आली आहे.

दादडे आश्रम शाळेतील एकूण 364 विध्यार्थीच अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी या 13 विध्यार्थी व 3 कर्मचारी असे 16 जण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. करोनाबाधित आढळलेल्या विध्यार्थ्यांना सौम्य लक्षणे आहेत तर अनेकांन मध्ये लक्षणे आढळून आलेली नाहीत. सर्व जण घरीच विलगीकरणात असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागा कडून देण्यात आली आहे. विक्रमगड येथील एका नामंकित शाळेत 46 विध्यार्थी व 8 कर्मचारी असे एकूण 54 जण पॉझिटिव्ह मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली होती असे असताना तालुक्यातील दादडे येथील आश्रमशाळेत 13 विध्यार्थी पॉझिटिव्ह मिळाल्याने आरोग्य प्रशासन हादरले असून तालुका आरोग्य विभाग अलर्ट झाला असुन कोरोना संसर्ग अधिक होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे.

विक्रमगड सारख्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना संसर्गाने बाधित होऊ लागल्याने पालकांची व नागरिकांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने सर्वांनी अधिक काळजी आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. करोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

"दादडे येथील आश्रम शाळेतील 364 विध्यार्थ्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली त्यापैकी 13 विध्यार्थी व 3 कर्मचारी असे एकूण 16 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून, या विध्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. या सर्वांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे."

-डॉ.संदीप निंबालकर, तालुका आरोग्य अधिकारी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus(vikramgad)
loading image
go to top