गोराई डंम्पिंगवरही कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा विचार

गोराई डंम्पिंगवरही कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा विचार

मुंबई: शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्यात आलेल्या गोराई डंम्पिंगचा भूखंड मोकळा करुन तेथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत आहे. त्यासाठी सल्लागार म्हणून मुंबई आयआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. 

महानगर पालिकेने 2009 मध्ये गोराई डंम्पिंग शास्त्रोक्त पध्दतीने बंद केले आहे. या डंम्पिंगमधून निघणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण आता कमी होऊ लागल्याने कचऱ्याचे विघटन होण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे ही जागा मोकळी करुन तेथे कचऱ्यापासून वीज निर्मिती अथवा मटेरीयल रिकव्हरी प्रकल्प राबविण्याचा विचार महापालिका करत आहे. हा प्रकल्प राबविण्यापूर्वी येथील कचऱ्याचे शास्त्रीय विश्‍लेषण करण्यासाठी महानगरपालिका मुंबई आयआयआटी या संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 80 लाख रुपये महानगरपालिका खर्च करणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीनेही मंजूर दिली आहे. 

गोराई डंम्पिंग हे 19 हेक्‍टरवर पसरले असून सध्या त्या संपूर्ण परिसरात 26 मिटर उंचीचा कचऱ्याचा डोंगर आहे. हा कचरा शास्त्रोक्त पध्दतीने बंद करुन त्यातून निघणारा वायू एकत्र करुन जाळला जात आहे. त्याच कचऱ्यातून निघणारा चिखलही एकत्र केला जात आहे. त्याच बरोबर कचऱ्याचा उग्र दर्प येऊ नये म्हणून फवारणीही केली जाते. 1972 पासून येथे कचरा टाकला जात होता. 2007 मध्ये पालिकेने हे डंम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2009 मध्ये शास्त्रोक्त पध्दतीने हे डंम्पिंग बंद करण्यात आले. युनायटेड फॉस्फरस या कंपनीला हे काम 15 वर्षांसाठी देण्यात आले होते ती मुदत 2023 मध्ये संपणार आहे. 

2.34 दशलक्ष टन कचरा

या डंम्पिंगवर 2.34 दशलक्ष टन कचरा जमा असून 2009 पासून आतापर्यंत कचऱ्याच्या विघटनातून निर्माण होणारा मिथेन वायू जमा करुन तो जाळला जात आहे. मात्र, आता या मिथेन वायूचे उत्सर्जन कमी होऊ लागल्याने कचऱ्याचे विघटन होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती या प्रस्तावात प्रशासनाने नमूद केली आहे.

19 हेक्‍टरवर कचरा पसरला असून आयआयटीने कचऱ्याचा अभ्यास केल्यानंतर नक्की तेथे असलेल्या कचऱ्याचे काय करता येईल याचा निर्णय होईल. मात्र,19 हेक्‍टर जमिनीपैकी जास्तीत जास्त जमिनीवरील कचरा हटवून त्या जमिनीचा वापर करण्यास पालिकेचा प्राधान्य असले एका अधिकाऱ्याने सांगितले. 

--------------

(संपादन- पूजा विचारे)

Thought setting up a project generate electricity from waste Gorai dumping

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com