जेएनपीटी बंदरात अडकला हजारो मॅट्रिक टन कांदा; निर्यातदारांना दररोज हजारोंचा फटका

जेएनपीटी बंदरात अडकला हजारो मॅट्रिक टन कांदा; निर्यातदारांना दररोज हजारोंचा फटका

उरण : केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जेएनपीटी बंदरात चार दिवसांपासून अडकून पडलेल्या कांद्याच्या प्रत्येक रिफर कंटेनरसाठी निर्यातदारांना प्रति दिन 1500 रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहेत. कांदा निर्यातीसाठी मोजाव्या लागणाऱ्या या अतिरिक्त ज्यादा खर्चामुळे निर्यातदार मात्र हैराण झाले आहेत.

केंद्र सरकारने सोमवारपासून तडकाफडकी कांदा निर्यातबंदी लादली आहे. या निर्यातबंदीमुळे जेएनपीटी बंदरातून युरोप आणि मिडल ईस्ट येथे निर्यातीसाठी आलेले कांद्याचे 162 कंटेनर बंदरात अडकून पडलेले आहेत. जेएनपीटी बंदरासह अंतर्गत असलेल्या अन्य तीन खासगी बंदरांतील प्रत्येक कंटेनरमध्ये 25 टनप्रमाणे एकूण 3 हजार 888 मॅट्रिक टन कांदा पडून असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली आहे. चार दिवसांपासून अडकून पडलेल्या कांद्याच्या प्रत्येक रिफर कंटेनरसाठी निर्यातदारांना प्रतिदिनी 1500 रुपये अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. या अतिरिक्त खर्चामुळे निर्यातदार मात्र हैराण झाले आहेत.

अशी होते निर्यात
निर्यातीसाठी पाठविण्यात येणारा कांदा सुस्थितीत पोहचण्यासाठी निर्यातदार कंपन्या रिफर कंटेनरचा वापर करतात. रिफर कंटेनरसाठी बंदर आणि जहाजातही वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. यासाठी विविध कंपन्यांकडून वेगवेगळे चार्जेस आकारले जातात. 

निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण
निर्यातबंदी उठेपर्यंत निर्यातदारांना रिफर कंटेनरसाठी आणखी किती दिवस अतिरिक्त चार्जेस मोजावे लागणार, याची कल्पना नसल्याने निर्यातदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. जेएनपीटी परिसरातील अन्य गोदामांतही कांद्याचे कंटेनर अडकून पडले आहेत. मात्र, त्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप तरी उपलब्ध नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

जेएनपीटीच्या वाहतूक नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार... 
बंदरात अडकून पडलेले कंटेनर

जेएनपीसीटी बंदर - 7
खासगी जीटीआय - 151
एनएसआयसीटी 1 
एनएसआयजीटी- 3

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com