

Maharashtra Teachers Unite in Mumbai for Nai Talim Yatra as Vasti Shala Teachers Demand Old Service Linkage Benefits
esakal
मुंबई: शिक्षण हक्काचे संरक्षण, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी शिक्षक भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नई तालीम यात्रेला’ राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून हजारो शिक्षक या यात्रेत सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले.