
मुंबई : राज्यातील प्राथमिकच्या सुमारे 6 हजार 500 हून अधिक शाळांमध्ये वीजच पोहोचली नसल्याचा आरोप संघर्ष वाहिनी या संघटनेने केला आहे. या शाळा अंधारकोठडीत भरत असल्याने सरकारकडून जून महिन्यात सुरू करण्यात येते असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे विजेचे बिले न भरले नसल्याने तब्बल हजारो शाळांमध्ये वीज नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
ज्यात शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिकच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या 1 लाख 6 हजार 237 इतक्या आहेत. या शाळांपैकी तब्बल 6 हजार 500 हून अधिक शाळांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही. वीज नसलेल्या या बहुतांश शाळा ग्रामीण दुर्गम आणि आदिवासी वस्ती, पाडे आदी ठिकाणच्या असल्याने सरकारकडून सुरू करण्यात येणारे ऑनलाईन शिक्षण या शाळांपर्यंत कसे पोहोचेल असा प्रश्न शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींकडून उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक धोरण राबविण्यात आल्यानंतरही तब्बल 42 हजारांहून अधिक प्राथमिकच्या शाळांमध्ये संगणक पोहोचलेले नाहीत तर माध्यमिकच्या 5 हजार 600 हून अधिक शाळाही संगणकापासून दूरच राहिलेल्या असल्याची माहिती सरकारच्या एका अहवालातून नुकतीच समोर आली आहे.
'संघर्ष वाहिनी'चे संघटक मुकूंद आडेवार म्हणाले की, आमच्या गाव-पाड्यावरच्या 6 हजारांहून अधिक शाळांमध्ये अजून वीजच नाही. इंटनेट आणि बाकी गोष्टींचा आम्ही विचारही करू शकत नाही. असे असताना सरकार ऑनलाईन शिक्षण देण्याची घोषणा करत आहे.
याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी वारंवार संपर्क केल्यानंतरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
किमान वेळेत पुस्तके द्या
ज्या लोकांची दोन वेळच्या खाण्याची चिंता असलेल्या समाजात ऑनलाईनसाठी मोबाईल, पाहण्यासाठी टीव्ही आणायचा कुठून असा सवालही त्यांनी केला. गावपाड्यांपर्यंत इतर वेळेत पुस्तके यायला कधी दिवाळी उजाडते, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आम्हाला दूर असल्याने यावेळी किमान आमच्या मुलांना वेळेत पुस्तके मिळतील असा सवालही त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.