सचिन वाजेच्या ह्रदयात तीन ब्लॉक, हार्ट सर्जरी आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin waze

सचिन वाजेच्या ह्रदयात तीन ब्लॉक, हार्ट सर्जरी आवश्यक

मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh hiren death case) प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाजे ह्दयविकाराने आजारी आहे. त्याच्यावर ह्दय शस्त्रक्रिया (heart surgery) करणं आवश्यक असल्याचं त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. सचिन वाजेच्या (sachin waze case) ह्रदयात ३ ब्लॉक आहेत. जे ९० % हून अधिक आहेत. सचिन वाजेच्या वकिलांनी कोकीळाबेन, (kokilaben hospital) सुराना किंवा सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी न्यायालयाकडे विनंती केली.

दरम्यान NIA नं कोर्टाकडे मागितलेली सचिन वाजेची कस्टडी कोर्टाने नाकारली. सचिन वाजेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी दिली आहे. सुराना रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. उपचारानंतर १५ दिवसात काय उपचार करण्यात आले, त्याची कागदपत्र जमा करण्याचे न्यायाधिशांनी आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Tokyo Paralympic: नीरज चोप्राने मानले अवनीचे आभार, कारण...

सचिन वाजेला चालताना त्रास होत असल्याने व्हिल चेअरच्या केलेल्या मागणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. दरम्यान वाजेला न्यायाधिशांनी मानेशी बोलत असल्याने फटकारले. या दोघांना न्यायाधिशांनी आरोपींच्या बसण्याच्या जागेवर पाठवलं. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या जवळबसून बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी दोघांना फटकारत अंतर ठेवण्यास सांगितले.

हेही वाचा: भावना गवळींकडे 7 कोटी आले कुठून? ED कारवाईनंतर सोमय्यांचा हल्लाबोल

NIA ने कोर्टाकडे सचिन वाजेची २ दिवसाची व सुनिल मानेच्या ४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. या गुन्ह्यात ३० दिवस कस्टडी मिळते. त्यानुसार सचिन वाजेची २८ दिवस कस्टडी झालेली असून २ दिवस कस्टडी बाकी आहे. तर सुनिल मानेची १४ दिवस कस्टडी झालेली आहे. त्यामुळे मानेची ४ दिवस कस्टडी मागण्यात आली आहे. मात्र दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर तपासा दरम्यान काही महत्वाचे पुरावे NIA च्या हाती लागलेले आहे. हे पुरावे एका संशयित आरोपीचे आहेत.त्या अनुशंगाने तपास करणे गरजेचे आहे. आरोपींकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळून आली होती. पैशांचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यानुसार दोघांकडे चौकशी करायची असल्याचा युक्तीवाद NIA कडून करण्यात आला.

Web Title: Three Block In Sachin Waze Heart Surge Necessary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sachin waze