esakal | कोरोनावर लस येण्याची शक्यता धुसर? चिंता वाढवणारा अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

जगभरात अनेक देशात कोरोना आजारावरील लस शोधण्यासाठी संशोधन सुरु आहे. यातील काही चाचण्या अंतिम टप्प्यावर आल्याचा दावाही करण्यात येत आहे; मात्र कोरोनावरची लस प्रत्यक्षात येण्याची खात्री कमी आहे.

कोरोनावर लस येण्याची शक्यता धुसर? चिंता वाढवणारा अहवाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : जगभरात अनेक देशात कोरोना आजारावरील लस शोधण्यासाठी संशोधन सुरु आहे. यातील काही चाचण्या अंतिम टप्प्यावर आल्याचा दावाही करण्यात येत आहे; मात्र कोरोनावरची लस प्रत्यक्षात येण्याची खात्री कमी आहे. सीएनएनच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. जगभरात डेंग्यु आणि एचआयव्ही सारख्या आजाराने लाखो बळी घेतले; मात्र अजूनही यावरील लस तयार होऊ शकली नाही यावरही या अहवालात बोट ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा : अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

एचआयव्ही, डेंग्युवर अजून लस नाही 
कोरोना महामारीने आतापर्यंत जगभरात अडीच लाख नागरिकांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या भितीने लॉकडाऊन उठवण्यासही अनेक देश कचरत आहेत. कोरोनावरची लस येईपर्यंत स्थिती पुर्वपदावर येणार नाही, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात कोरोना लस येणार नाही, याची शक्यता जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या चार दशकांपासून जगभरात एचआयव्ही रोगाने 32 लाख लोक दगावले. दरवर्षी चार लाख लोकांना डेंग्यूची लागण होते. गेले चार दशके या आजारावर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र अजूनही यश आले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 

नक्की वाचा : म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

डेंग्यूवरील लस परिणामकारक नाही
काही देशांनी डेंग्युसाठी प्रतिबंधात्मक लस शोधून काढल्याचा दावा केला आहे. 9 ते 45 वयोगटातील व्यक्तींना या लस देण्यात येतात; मात्र केवळ डेग्युचे निदान झालेल्या व्यक्तींसाठी या लस अधिक सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. उलट या लस अधिक अपायकारक असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे. डेग्युंची कुठलीही बाधा नसलेल्या व्यक्तीला ही लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला भविष्यात डेंग्युची लागण झाल्यास त्याचे स्वरुप तीव्र असतील, असा निष्कर्ष अमेरिकन साथरोग प्रतिबंधक केंद्राने काढला आहे. या लसीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे संचालक सनोफी पेस्टर यांनीही 2017 मध्ये याला दुजोरा दिला होता.

हे नक्की वाचा : पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

कोरोनावर लस येण्याची खात्री नाही 
जगभरात काही साथरोगांवर प्रतिबंधात्मक लस शोधण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. त्यामुळे कोरोनावरची लस प्रत्यक्षात येईल का? आणि लस आली तरी,  सुरक्षितता आणि परिणामकारक या दोन कसोटीवर ती खरी उतरेल हा प्रश्न आहे, असे अहवालात डॉ. डेव्हिड नबारो यांनी म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला कोरोना सोबतच जगावे लागणार आहे. सर्दी, खोकला, तापावर दुर्लक्ष करण्याची संस्कृती आता हद्दपार करावी लागणार आहे. तर कामाच्या संस्कृतीवर याचे अनेक बदल होणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मोठी बातमी : लॉकडाऊन इफेक्ट ! विकासकामं रखडल्याने कोट्यवधींचा निधी वाळ्या जाणार?

कोरोना लस संशोधनाची मोहीम तीव्र 
ऑक्सफोर्डच्या जेनर इस्टिट्यूटच्या देखरेखीखाली अनेक संशोधकांनी लसीकरीता संशोधन सुरु केले आहे. आतापर्यंत 102 लसीची चाचणी सुरु आहे. त्यापैकी 8 लसींचे माणसावरही परिक्षण करण्यात आले आहे; मात्र याची परिणामकारकता आणि प्रत्यक्ष  बाजारात येण्यास अजुन बराच वेळ लागणार आहे.

The chances of getting a coronavirus vaccine are slim Findings from the CNN report

loading image