
Oman Containers Found In Palghar Beach
ESakal
पालघर : ओमानच्या समुद्रातून कंटेनर वाहून नेणाऱ्या एम. व्ही. फोनिक्स १५ या मालवाहू जहाजाला ऑगस्टमध्ये जलसमाधी मिळाली होती. जहाजवरील कंटेनर अरबी समुद्रात भरकटले होते. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना इशाराही दिला होता. आता हे कंटेनर शिरगाव सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर लागले असून, ते ओमानमधील त्याच जहाजावरील असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सातपाटी येथे दोन तर शिरगाव येथे एक कंटेनर समुद्र प्रवाहासोबत वाहून आला आहे.