मुंबई : विदेशी शस्त्र बाळगल्याप्रकरणी चित्रपट सृष्टीत काम करणारे तीघे गजाआड | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprits arrested
मुंबई : विदेशी शस्त्र बाळगल्याप्रकरणी चित्रपट सृष्टीत काम करणारे तीघे गजाआड

मुंबई : विदेशी शस्त्र बाळगल्याप्रकरणी चित्रपट सृष्टीत काम करणारे तीघे गजाआड

मुंबई : विदेशी बनावटीचे पिस्तुल (foreign made pistol) आणि जीवंत काडतुसं (live rounds) बाळगल्याप्रकरणी फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या तिघांना दिंडोशी पोलिसांनी (dindoshi police) अटक केलीय. गुरुजीत सिंग (३१), निकुंजकुमार पटेल (२६) आणि प्रकाळ सनतानी (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे (three culprit arrested) आहेत. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून खबर मिळाल्यानंतर १० जानेवारीला आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (three culprit arrested from film production house in possession of foreign weapon crime)

हेही वाचा: सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष; भाजपचे प्रसाद लाड पराभूत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला ६ लाख रुपये एका व्यक्तीकडून देणं होतं. देणेकऱ्याला धमकावण्यासाठी त्या आरोपीने मध्यप्रदेशमधून शस्त्रे आणली. त्यानंतर त्याने त्याच्या सहकारी आरोपीकडे ती शस्त्रे सुरक्षीत ठेवण्यासाठी दिली होती. पोलिसांनी वेळीच सापळा रचून या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याजवळ असलेला एक लाख दोन हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top