
पाच ते सहा दिवसांपूर्वी एक कार महामार्गावरून बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली. झाडाझुडपांमुळे कुणालाच इथं अपघात झालाय किंवा काही भयंकर घडलंय याची माहिती समजली नाही. पण गुरं चारण्यासाठी गेलेल्या महिलेला झुडपात कार दिसली. कारमध्ये डोकावून पाहताच महिलेला मोठा धक्का बसला. कारमध्ये तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातल्या उंबरमाळी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.