मोठी बातमी - शिवसेना भवन आता शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद, कारण आहे..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय.

मुंबई - कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. दादर येथील शिवसेना भवनामध्येही कोरोनानं शिरकाव केला आहे. शिवसेना भवनातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.

शिवाजी पार्क परिसरात शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनात कोरोनाचा संसर्ग झाला. शिवसेना भवनात हे तिन्ही कर्मचारी काम करत आहेत. या तिघांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही क्वांरटाईन करण्यात आलं आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच संपूर्ण सेना भवनाचे निजंर्तुकीकरण करण्यात आलं. 

मोठी बातमी महामुंबईतील 'या' क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

शिवसेना भवन शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद

शिवसेना भवनातील सर्व कार्यालयं बंद करण्यात आले असून सर्व सामान्यांना सेना भवनात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. तसंच सेना भवनातील सर्व गाळे आणि कार्यालये बंद करण्यात आले. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकास कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शिवसेना भवन बंद ठेवण्यात आलं. नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात न येण्याच्या सूचनाही पक्षानं दिल्यात.

19 जूनला शिवसेना भवनात नुकताच पक्षाचा 54 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी शिवसेना भवनात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी होते उपस्थित होते. 

मोठी बातमी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा; पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यात आजपासून वाढ...
 

पुन्हा राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनाचा शिरकाव

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनानं शिरकाव केला आहे. राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही वाहन चालकांवर सध्या मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाला होता. कारण राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले. त्यानंतर आता दोन वाहन चालकांना कोरोनाची लागण झाली आहे.

three detected with covid 19 positive in shivsena bhawan shivsena bhavan closed for few days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three detected with covid 19 positive in shivsena bhawan shivsena bhavan closed for few days