अफवेने घेतला तिघांचा बळी, चोर समजून ग्रामस्थांचा हल्ला

हल्ला करण्यात आलेली वाहने
हल्ला करण्यात आलेली वाहने

विरार : ग्रामीण भागात लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे रात्री दरोडेखोरांचा वावर वाढल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरल्या आहेत. त्याचा फटका तलासरीतील खानवेलकडे जाणाऱ्या वाहनचालकासह दोन प्रवाशांना बसला. गडचिंचले येथील जवळपास 400 च्या जमावाने माग्रामस्थांनी या तिघांना चोर समजून दगड व इतर साहित्यांचा वापर करून ठार मारल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. माहानंत कल्पऋक्ष गिरी, निलेश सुरेश तेलगडे (चालक) आणि चिकने महाराज अशी मृतांची नावे असून ते सुरतला जात होते.

हे वाचलं का? : लोककलावंतांच्या मानधनासाठी आनंद शिंदे सरसावले

दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिकहून येणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी गुरुवारी रात्री 9.30 ते 10 वाजता रोखले. या प्रवाशांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी दगड आणि व इतर साहित्याने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा पोहोचला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या वाहनांचीही मोडतोड केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.न​                               

महत्त्वाचे : शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावू नये

समाजसेवकाला मारहाण
काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावातही अशीच घटना घडली होती. धान्य वाटप करण्यासाठी आलेल्या ठाण्यातील एका समाजसेवकाला मारहाण झाली होती. पोलिसांचे वाहन व एका खासगी वाहनांवरही दगडफेक करून मोडतोड करण्यात आली होती.

हे वाचलंत का : यूसीएससीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

कासा गावाला पोलिस छावणीचे स्वरूप

घटनेची माहिती जिल्हा पोलिस दलाला मिळाल्यावर शुक्रवारी जवळपास जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांचे प्रमुख,  400  क्रमचारी आणि एसआरपी यांनी आरोपींचा घनदाट जंगलात शोध घेतला. पाठलाग करत 110 आरोपींना त्यांनी पकडून आणले. सर्वांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलिस प्रमुख गौरव सिंग, प्रांत अधिकारी सौरभ कटियार, सर्व पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी वर्ग आदी हजर होते.

चोर फिरत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संचारबंदी असताना संबंधित प्रवासी मुंबई ते दादरानगर हवेली परिसरात पोहचलेच कसे? मार्गात अनेक चौक्या व टोल नाके असून त्यांना अडवले कसे नाही, याचीसुद्धा चौकशी केली जाईल. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा हाती घेऊ नका. प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळा.
- डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com