Crime
sakal
पनवेल : कारला एसटी बस घासल्याच्या किरकोळ कारणावरून चारचाकीमधील तिघांनी भररस्त्यात बसचालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पनवेल येथील आसूड गाव येथे गुरुवारी (ता. १) सकाळी घडली. या घटनेत आरोपींनी केवळ एसटीचालकालाच नाहीतर मध्यस्थी करणाऱ्या दोन महिला प्रवासी व वाहकालादेखील धक्काबुक्की करून मारहाण केली. खांदेश्वर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.