अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, वाशी आरटीओत कोरोनाचा शिरकाव 

सुजित गायकवाड
Tuesday, 15 September 2020

तीन अधिकाऱ्यांना लागण ; इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

नवी मुंबई :  शहरात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना यातून बचावलेल्या वाशी उपप्रदेशिक वाहतूक कार्यालयातही अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कार्यालयातील तीन मोटार वाहन निरीक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले आहे. तीन अधिकाऱ्यांंच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. 

कोरोनामुळे याआधीच वाहन नोंदणी आणि परवाने घेण्यासाठी येणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. तरी सुद्धा अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालय सुरू आहे. वाहन नोंदणी व वाहतूक परवाने प्रक्रीया बाधित होऊ नये म्हणून गरजेपूरते कर्मचारी बोलवून वाशीचे उपप्रादेशिक वाहतूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. कार्यालयात येणाऱ्या वाहनांची दैंनदिन नोंदणी करण्यात येत आहे. व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क आणि सॅनिटाईजरचा काटेकोरपणे वापर करून गेल्या सहा महिने कार्यालयाच्या कामात खंड आला नव्हता.

धक्कादायक खुलासा ! रिया आणि सुशांतने बनवला होता एक खास WhatsApp ग्रुप, चर्चा व्हायची ड्रग्सची

परंतू, दोन दिवसांपूर्वीच कार्यालयातील तीन मोटार वाहन निरीक्षकांना अचानक शाररीक त्रास जाणवू लागला. कोरोनासदृश्य लक्षणे असल्यामुळे त्यांना घरी पाठवून डॉक्टरांमार्फत तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर ते तिघेही कोरोनाबाधित असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांमार्फत वाशी आरटीओ कार्यालयाला सांगण्यात आले आहे. त्यानुसार त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकाऱ्यांनाही कोरोना चाचणी आणि सुरक्षित अंतर पाळावे लागणार आहे. तीन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे काही काळाकरीता वाहन नोंदणी आणि परवाने प्रक्रीयांवर परिणाम होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

three officers at vashi RTO detected corona positive other workers and officers in tension


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three officers at vashi RTO detected corona positive other workers and officers in tension