केडीएमसीत खड्ड्यांमुळे तिघे जखमी ; दुचाकीचेही नुकसान 

ऋषिकेश चौधऱी
Friday, 2 October 2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हेच खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये देखील वाढ होते आहे. गुरुवारी (ता.1) खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. 

उल्हासनगर ः कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हेच खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये देखील वाढ होते आहे. गुरुवारी (ता.1) खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. 

नवी मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर; पुन्हा कठोर नियम, आयुक्तांचे आदेश

अपघात जखमी झालेल्यांमध्ये केडीएमसीच्या परिवहन उपक्रमाचा चालक, मनसे सचिव प्रशांत पोमेंडकर आणि एक महिलेचा समावेश आहे. पोंमडेकर यांचा डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन नजीक रस्तावर खड्ड्यात तोल जाऊन अपघात झाला. तर डोंबिवलीत उस्मा पेट्रोल पंप परिसरात एका महिला रस्त्यावरील खडयामुळे पडून तिच्या डोक्‍याला मार लागला. कल्याण पश्‍चिमेतील प्रथमेश वाघमारे हा तरुण रस्त्यावरुन जात असता खड्डयात त्याची दुचाकी आदळली. सुदैवाने तो बचावला आहे.

 महाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे; महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांत राज्य तिसऱ्या क्रमांकावर

मात्र त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कल्याण पश्‍चिमेतील केडीएमटीचे बस चालक अवतार सिंग हे दुचाकीवरुन कामावर जात असताना सहजानंद चौकातील खड्डयात त्यांची बाईक आदळून ते खाली पडले. त्याच्या डाव्या गुडग्याला गंभीर दुखापत झाली आहे. 
दरम्यान पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून पावसाने उघडीप देताच रस्त्याची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप खड्डे कायम आहेत. 

 

Three persons injured in an accident due to potholes in KDMC

 

(संपादन ः रोशन मोरे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three persons injured in an accident due to potholes in KDMC