धक्कादायक ! मुंबईत आज तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू; दोन आठवड्यात 'इतक्या' पोलिसांनी गमावला जीव...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

मुंबईतील कोरोनावर उपचार घेणाऱ्या पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. याशिवाय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेकडून रेमडेसीवीर व टॉसिलिझ्युमॅब सारखी औषधीही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा संकट गडद होत असून मुंबईकर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या पोलिसांना मात्र कोरोनाशी अविरतपणे लढा द्यावा लागत आहे. उन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना मात्र कोरोनामुळे आपल्या जीवाला मुकत आहे. मुंबईत आज दिवसभरात तीन पोलिसांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 15 झाली आहे.

70 वर्षांवरील नागरिकांच्या चाचणीसाठी बीएमसीचा नवा नियम; जाणून घ्या महत्वाची माहिती

आज सहायक उपनिरीक्षकासह तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात मुंबईत 15 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या तीन पोलिसांच्या मृत्यूमुळे  राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. सर्वाधिक म्हणजे 37 पोलिसांचे मृत्यू एकट्या मुंबईत झाले आहेत.

'कोविड योद्धा' साठी BMC कडे तब्बल 3 हजार अर्ज; परंतु भरती मात्र एवढ्यांचीच

मरिन ड्राईव्ह येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा गुरूवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 14 जूनपासून ते सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत होते. गिरगाव येथे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे. त्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे ते सध्या सुटीवर होते.
 
लॉकडाऊन असेल, पण पोटाला कुलुप कसे लावणार? अनेकांनी शोधला वेगळा मार्ग

याशिवाय समता नगर पोलिस ठाण्यातील 54 वर्षीय पोलिस हवालदाराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. ते गुरूनानक रुग्णालयात उपचार घेत होते. 13 जूनपासून ते सुटीवर होते. 19 जूनला ते आजारी झाले होते. 24 जूनला त्यांची तब्येत सुधारली होती. त्यावेळी कुटुंबिय व सहकाऱ्यांसोबत त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संभाषणही केले होते. पण गुरूवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक खराब झाली. ते पत्नी, मुलगा, सून व मुलगी यांच्यासोबत दहिसर पोलिस वसाहतीत वास्तव्याला होते. 

बेस्टनं 'त्या' कर्मचाऱ्यांवर केली कठोर कारवाई

दादर येथीलही 54 वर्षीय  पोलिस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होते. माहिम येथील पोलिस वसाहतीत वास्तव्याला असलेल्या या पोलिस कर्मचाऱ्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. 25 मेला त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. आतापर्यंत मुंबईतील 2550 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 1750 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. 692 पोलिस सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्य पोलिस दलातील 4100 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुसंख्या पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सध्या 991 पोलिस सध्या उपचार घेत आहेत.

मुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...

मुंबईतील कोरोनावर उपचार घेणाऱ्या पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. याशिवाय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेकडून रेमडेसीवीर व टॉसिलिझ्युमॅब सारखी औषधीही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पण त्यानंतरही गेल्या दोन आठवड्यात 15 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three police personel passed away due to corona virus infection in mumbai