Snake Bite : पालघरमध्ये सर्पदंशाने एका ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पालघर शहरातील भरवाड पाडा परिसरातील आतिफ आशिक खान या तीन वर्षीय चिमुकल्यासोबत एक दुःखद घटना घडली असून सर्पदंशामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची बाब आली समोर.
Three-Year-Old Child Dies of Snakebite in Palghar

Three-Year-Old Child Dies of Snakebite in Palghar

sakal

Updated on

- निखिल मेस्त्री

पालघर - पालघर शहरातील भरवाड पाडा परिसरातील आतिफ आशिक खान या तीन वर्षीय चिमुकल्यासोबत एक दुःखद घटना घडली असून सर्पदंशामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. पालघरच्या ग्रामीण रुणालयात त्यावर उपचार केले गेले. मात्र आपत्कालीन आणि अति आवश्यक आरोग्य सुविधा नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात नेत असताना त्याचा जीव गेला. या घटनेनंतर सरकारी आरोग्य व्यवस्थेमधील सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जिल्हा रुग्णालय आणि ट्रॅमा केयर सेंटर तात्काळ सुरु करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com