मोखाडा : वाघाशी झुंज! पतीने वाचवले पत्नीचे प्राण

Tiger Attack
Tiger Attacksakal media

मोखाडा : मोखाड्यातील पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील पारध्याची मेट येथील शेतावर राहणाऱ्या काशिनाथ सापटे व त्यांची पत्नी पार्वती सापटे (Parvati sapte) हे रात्री झोपले असताना, बाहेर कसला तरी आवाज आला म्हणून पार्वती सापटे (६५) बघायला उठल्या आणि अचानक (Tiger attack) वाघाने तिच्यावर हल्ला आहे. जिव वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी त्यांचे पती काशिनाथ सापटे यांनी जीवाची पर्वा न करता वाघाच्या हल्ल्याचा प्रतिकार करत मुकाबला केला आणि आपल्या पत्नीचे प्राण (Husband saves wife) वाचवले आहे. जखमी पार्वतीवर प्रथमोपचार केल्यानंतर, नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात (Nashik civil hospital) उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पटेरी वाघाच्या या हल्ल्याने, मोखाड्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

Tiger Attack
रायगड: जलवाहतूक दहा टक्क्याने स्वस्त होणार; सरकारच्या निर्णयाचा प्रवाशांना फायदा

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असं की, मोखाड्यातील पारध्याची मेट येथील रहिवासी पार्वती व काशिनाथ सापटे हे वृध्द दांम्पत्य शेतावर राहत असतांना शुक्रवारी रात्री पार्वती कुठल्यातरी आवाजाने घराबाहेर आल्या. त्यावेळी त्यांच्यावर पटेरी वाघाने अचानक हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केल्याने, त्यांचे पती काशिनाथ सापटे (७२) यांनी वाघाच्या हल्ल्याचा प्रतिकार केला. त्यावेळी तेथुन वाघाने धुम ठोकली. मात्र, नरभक्षक वाघ पुन्हा हल्ला करण्यासाठी दबा धरून बसला होता. पुन्हा वाघाच्या हल्ल्याची चाहुल लागताच, सापटे पती- पत्नी ने आरडाओरडा केला. त्यावेळी पारध्याचीमेट ग्रामस्थ मदतीसाठी धावले आणि वाघाला पिटाळून लावले.

मात्र, वाघ काही तासाने परत एकदा गावाकडे चाल करून येताना ग्रामस्थांना दिसला त्यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक वनखात्याच्या कर्मचार्यांला फोन करून पाचारण केले. रात्रभर गावाभोवती स्थानिक तरुणांनी गस्त घातली. जखमी पार्वतीवर प्रथमोपचार केल्यानंतर, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सकाळीच शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी पारध्याची मेट येथे जाऊन ग्रामस्थांना धीर दिला तसेच हल्ला झालेल्या कुटुंबाचे सांत्वन करत, काशिनाथ सापटे यांचे कौतुक करून त्यांना आर्थिक मदत दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com