मोखाडा - मोखाडा गावातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर वाहने ऊभी करणे, रस्त्यालगत वाहणे ऊभी करणे यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच मोखाडा तहसीलदारांच्या निर्देशानुसार सकाळी 9 च्या अगोदर आणि संध्याकाळी 6 नंतर मालवाहतूक वाहनांमधून माल खाली करण्याच्या नोटीसासह समज, मोखाडा पोलीसांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना समज देण्याऐवजी, व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या अन्यायकारक निर्णयावर मोखाड्यातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.