
मुंबई : शहरामध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष उपायोजना केल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात, नागरिकांनी पर्यावरणस्नेही मूर्तींची खरेदी करावी, यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांतर्गत शहरात २७५ हून अधिक कृत्रिम तलाव सज्ज करण्यात येत आहेत.