esakal | रवि पुजारीच्या ताब्यासाठी पोलिसांची आफ्रिकेतील कोर्टात विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

ravi pujari

रवि पुजारीच्या ताब्यासाठी पोलिसांची आफ्रिकेतील कोर्टात विनंती

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: कुख्यात गुंड रवि पुजारीचा (gangster ravi pujari)ताबा मुंबई पोलिसांनी (Mumbai police) पुन्हा बंगळुरु पोलिसांकडे सोपवला आहे. मुंबई पोलिसांनी १० गुन्ह्यात त्याची चौकशी केली असून त्यापैकी एका गुन्ह्यात आरोपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दहा गुन्ह्यांचा व्यतिरिक्त अन्य ९ गुन्ह्यात त्याचा ताबा पुन्हा मिळावा. यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा आफ्रिकेतील सेनेगल कोर्ट (africa senegal court) आणि बंगळुरु तपास यंत्रणेकडे विनंती केली आहे. (To investigate gangster ravi pujari in nine cases Mumbai police request to africa court)

या ९ गुन्ह्यात मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना दिलेल्या धमकींच्या गुन्ह्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या रवी पुजारी याच्या विरोधात मुंबईत ४९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २६ गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. २०१७-१८ मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या.

हेही वाचा: घाटकोपरमध्ये 'सेक्सटॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश

२००९ ते २०१३ दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते. पुजारी विरोधात बंगळूरुत ३९, मंगलोरमध्ये ३६, उडीपीत ११, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा पुजारीच्या विरोधात दाखल आहे. पुजारीच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे ७५ गुन्हे दाखल आहेत.