नेरळ परिसरात गुटखा विक्रीचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

नेरळ गाव आणि परिसरातील दुकानदारांना होलसेलमध्ये गुटख्याची विक्री करणारा एकच विक्रेता असून, त्याच्याकडून कळंबपासून कशेळे आणि खांडस या भागात जाऊन गुटखा पोहच केला जातो. त्यासाठी या गुटखा विक्रेत्याने आपले गोडावून नेरळ गावाच्या बाहेर कोल्हारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारले आहे. 

नेरळः राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही येथील बाजारपेठेसह पान टपऱ्यांवर बिनदिक्कत गुटखा विक्री सुरू आहे. नेरळ पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पकडलेला गुटख्याचा साठा मातीत गाडला असतानाही गोडावून उघडून त्यात साठा करून गुटख्याची नेरळ आणि परिसरात खुलेआम विक्री सुरू आहे. पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या विक्रीमुळे नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

भायखळा छपाई कारखान जूननंतर बंद

नेरळ हे माथेरानचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असून, या रेल्वेस्थानकातून माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेन सोडली जाते. अशा जंक्‍शन रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडल्यावर राज्यात बंदी असलेला गुटखा तत्काळ उपलब्ध होतो. नेरळ स्थानकाच्या बाहेर एका गल्लीत गुटखा पोहच करणारे दुकान असून, त्या होलसेल दुकानदाराचे नेरळ गावाच्या बाहेर मोठे गोडावून असून, तेथून सर्व भागांत गुटखा पोहचवला जात असतो. नेरळ स्थानकासमोरील गल्लीत गुटख्याची ऑर्डर दिली की तत्काळ तासाभरात गुटखा पोहचत असतो. त्याचवेळी नेरळ बाजारपेठेतील अनेक ठिकाणी गुटखा विक्रेते असून, त्यातील अनेक व्यापारी गुटख्याची पाकिटे खिशात ठेवूनही फिरतात. ज्या वेळी गिऱ्हाईक गुटख्याची मागणी करेल की जादा भाव आकारून गुटख्याची पाकिटे दिली जातात. नेरळ बाजारपेठेमध्ये गुटखा मिळण्याची आणि गुटखा होलसेलमध्ये मिळण्याची ठिकाणे असून, सर्रास गुटख्याची विक्री केली असताना नेरळ पोलिसांकडून कोणतीही कारवाई करीत नाही. 
दुसरीकडे नेरळ गाव आणि परिसरातील दुकानदारांना होलसेलमध्ये गुटख्याची विक्री करणारा एकच विक्रेता असून, त्याच्याकडून कळंबपासून कशेळे आणि खांडस या भागात जाऊन गुटखा पोहच केला जातो. त्यासाठी या गुटखा विक्रेत्याने आपले गोडावून नेरळ गावाच्या बाहेर कोल्हारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारले आहे. 

गुटखा बंदीनंतर त्याची विक्री होत असेल तर कारवाईचे अधिकार अन्न व औषध प्रशासन यांना आहेत. त्यांनी छापा टाकण्यासाठी आमच्याकडे बंदोबस्त मागितला तर आम्ही तत्काळ देत असतो. त्यांच्या विभागाला अधिकार असल्याने आम्हाला काहीही करता येत नाही; पण कोणी तक्ररी केल्यास आम्ही त्या विभागाला कळवून छापा टाकायला सांगू शकतो. 
- अविनाश पाटील, प्रभारी पोलिस अधिकारी, नेरळ पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tobaco-sell-in nerel

टॉपिकस