आज प्रवेश न घेतल्यास 11वीच्या प्रवेशाला मुकावे लागणार, संध्याकाळपर्यंत अखेरची संधी

आज प्रवेश न घेतल्यास 11वीच्या प्रवेशाला मुकावे लागणार, संध्याकाळपर्यंत अखेरची संधी
Updated on

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या 11वीच्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी आज संध्याकाळपर्यंत अखरेची मुदत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आज नोंदणी करून प्रवेश न घेतल्यास त्यांना आपल्या प्रवेशाला मुकावे लागणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नव्हते. तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक चुकीमुळे आणि त्यांचे प्रवेश रद्द झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही अखेरची संधी दिली होती. यामुळेच ऑनलाईन नोंदणी करून थेट महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठीची आज अखेरची मुदत दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रवेश मिळाले होते. मात्र ज्यांना इतर आवडीच्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा आहेत अशा जागांवर सुद्धा प्रवेश घेण्यासाठीची सुद्धा ही अखेरची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आणि त्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाले. अशा विद्यार्थ्यांना आज प्रवेश घेण्यास काही अडचणी आल्यास उद्या सायंकाळपर्यंत सुद्धा त्यांना प्रवेश घेण्यास मुभा मिळणार आहे. मात्र आज त्यांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाहीत असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मुंबई महनगर क्षेत्रात 8 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या विशेष प्रवेश फेरीमध्ये आत्तापर्यंत 4 हजार 600 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेतले आहेत. तर आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये पुन्हा प्रवेश मिळावा म्हणून मिळालेल्या प्रवेशांमध्ये 17 जणांनी आपले प्रवेश रद्द केले आहेत. तर कागदपत्रे आणि विविध तांत्रिक कारणामुळे तब्बल सहा जणांचे प्रवेश रद्द झाले असून त्यांना सुद्धा आज संध्याकाळपर्यंत पुन्हा नव्याने अर्ज करता येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Today evening deadline admission 11th junior colleges Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com