आतील खबर : सत्ता स्थापनेसाठी आमदारांना 'या' वेळी येऊ शकतो मेसेज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

आज किंवा उद्या सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या आमदारांना मेसेज येऊ शकतो असं  बैठकीत आमदारांना सांगण्यात आलं आहे. खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली.

आज सकाळपासून अंत्यंत वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. सकाळपासून खरतर चर्चा होती कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला हलवण्यात येणार याची. मात्र तसं न होता सर्व आमदारांना मुंबईतील ललित हॉटेलमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, आज किंवा उद्या सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या आमदारांना मेसेज येऊ शकतो असं बैठकीत आमदारांना सांगण्यात आलं असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. 

कॉंग्रेस आमदारांची बैठक नुकतीच संपली आहे. त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोराथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याठिकाणी कॉंग्रेस आमदारांच्या सह्या घेण्यात आल्यात. मात्र या सह्या म्हणजे कॉंग्रेस आमदारांची हजेरी असल्याचं देखील थोरात यानी सांगितलंय. आज कॉंग्रेसच्या गटनेता निवड अपेक्षित होती, मात्र बैठकीत असं घडलं नाही. दरम्यान याबद्दलचे सर्व अधिकार सोनिया गांधी यांच्याकडे आहेत हे देखील बाळासाहेब थोराथ यांनी सांगितलं.  दरम्यान, आता कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा थांबलेली नाही असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितलंय.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, बच्चू कडूंना मंत्रीपदाची लॉटरी?
 

वरळीतील नेहरू सेन्टरमध्ये तीनही पक्षांची बैठक : 

काल  आणि आजच्या महत्त्वपूर्ण बैठका झाल्यानंतर आता मुंबईतील वरळीत नेहरू सेंटरला शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित बैठक होणार आहे. यामध्ये तीनही पक्षांचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. यामध्ये तीनही पक्षांची एकत्रितपणे पहिल्यांदाच चर्चा होताना पाहायला मिळणार आहे.  या बैठकीनंतर राज्यापालांकडे जाऊन सातास्थापानेचा दावा केला जाऊ शकतो असं देखील बोललं जातंय.

Web Title : today or tomorrow congress MLAs may get message to form government : 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today or tomorrow congress MLAs may get message to form government