काशीद समुद्रात बुडत असणाऱ्या तीन पर्यटकांचे जीवरक्षक व मुरुड पोलीस यांच्या मदतीमुळे पर्यटकांचे प्राण वाचले.

काशीद समुद्रात बुडत असणाऱ्या तीन पर्यटकांचे जीवरक्षक व मुरुड पोलीस यांच्या मदतीमुळे पर्यटकांचे प्राण वाचले.

समुद्रात बुडत असलेल्या तीन पर्यटकांना जीवदान मुरूड, ता. १० (बातमीदार) ः काशीद समुद्र किनारी बुडत असलेल्या तीन पर्यटकांना मुरूड पोलिसांनी जीवरक्षकांच्या मदतीने वाचविले. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. हे पर्यटक पुण्यातील कात्रज परिसरातील आहेत. रविवारी पाच जण काशीद येथे आले होते. त्यातील चौघे समुद्रात पोहण्यास उतरले होते. त्यातील तिघे पोहत असताना खोल समुद्राच्या दिशेने खेचले गेले. किनारा गाठणे अशक्य झाल्याने हातवारे करून त्यांनी पोलिसांना विनंती केली. त्यामुळे पोलिस शिपाई प्रशांत प्रभाकर लोहार यांनी ‘स्पीडबोट’ चालक संजय जाधव आणि जीवरक्षक राकेश रक्ते यांच्या साह्याने तिघांना बोटीत चढवले. किनारी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. श्रीकांत ढाके (वय २७), गणेश प्रकाश पाटील (२३) आणि मुरलीधर सोनावणे (२८) अशी पर्यटकांची नावे आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com