
उन्नत मार्गाच्या साडेसात किलोमीटर अंतरासाठी २७ कोटींचा खर्च
मुंबई, ता. २८ : घाटकोपर ते दक्षिण मुंबईतील वाडी बंदरपर्यंतच्या उन्नत मार्गाचा ७.६ किलोमीटरचा भाग गुळगुळीत करण्यात येणार आहे. यासाठी पालिका २७ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २०१५ मध्ये हा मार्ग तयार केला. तो आता पालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या मार्गाचा काही भाग खचला होता. त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. मात्र, रस्त्याचा दर्जा राखण्यासाठी व्हीजेटीआय या संस्थेची नियुक्ती केली होती. आता हा मार्ग तांत्रिक सल्ल्यानुसार दुरुस्त करण्यात येणार आहे. खडबडीत काँक्रीटचे पट्टे काढून टाकण्यात येणार आहेत.
...
या भागांत कामे
पांजरापोळ येथील बोगद्यापासून वडाळा भक्ती पार्कपर्यंतचा रस्ता गुळगुळीत करण्यात येणार आहे. हा भाग ७.६ किलोमीटरचा आणि १७ मीटर रुंदीचा आहे. बांधकामाचा थर ४० मिलिमीटर जाडीचा आहे. मास्टिक डांबरी प्रकारातील हा भाग आहे.
...
अंदाजापेक्षा ३१ टक्के कमी खर्च
पालिकेने या कामासाठी ३० कोटी ९४ लाखांचे अंदाजपत्र तयार केले होते; तर आर. के. मधानी या पात्र कंत्राटदाराने ३१.१० टक्के कमी दराने म्हणजे २१ कोटी ३१ लाख रुपयांत हे काम करण्याची तयारी दाखवली आहे. पालिका सर्व करांसह यासाठी २७ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..